गोळीबार प्रकरणानंतर दुबईत पोहोचलेला सलमान खान एन्जॉय करतोय बेली डान्स! सोशल मीडियावर Video Viral!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  गोळीबार प्रकरणानंतर दुबईत पोहोचलेला सलमान खान एन्जॉय करतोय बेली डान्स! सोशल मीडियावर Video Viral!

गोळीबार प्रकरणानंतर दुबईत पोहोचलेला सलमान खान एन्जॉय करतोय बेली डान्स! सोशल मीडियावर Video Viral!

Apr 20, 2024 07:53 AM IST

या व्हिडीओमध्ये, सलमान खान 'दिलबर अरबी' गाण्यावर एलनाजच्या नृत्याचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी डॅन्यूब ग्रुपचे संस्थापक रिझवान साजनही दिसले आहेत.

गोळीबार प्रकरणानंतर दुबईत पोहोचलेला सलमान खान एन्जॉय करतोय बेली डान्स! सोशल मीडियावर Video Viral!
गोळीबार प्रकरणानंतर दुबईत पोहोचलेला सलमान खान एन्जॉय करतोय बेली डान्स! सोशल मीडियावर Video Viral!

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला मुंबईत जीवे मारण्याच्या धमक्या येत असताना, तो दुबईमध्ये एलनाज नौरोजीच्या बेली डान्सचा आनंद घेताना दिसला आहे. नुकतेच वांद्रे परिसरात असलेल्या सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबारानंतर वातावरण चिंताजनक बनले होते. तथापि, या घटनांनंतरही सलमान खानने त्याच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ दिला नाही आणि शूटिंगपासून ते इतर प्रमोशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये जाणे सुरू ठेवले. आता तो कडेकोट बंदोबस्तात ते दुबईला रवाना झाला आहे.

सलमान खान दुबईमध्ये 'बीइंग स्ट्राँग फिटनेस इक्विपमेंट'ने डिझाइन केलेली जिम लॉन्च करणार होता. पापाराझी स्नेहकुमार झालाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये, सलमान खान 'दिलबर अरबी' गाण्यावर एलनाजच्या नृत्याचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी डॅन्यूब ग्रुपचे संस्थापक रिझवान साजनही दिसले आहेत. एकीकडे भारतातील सलमान खानची काळजी करत असताना, दुसरीकडे दबंग खानने गोळीबाराच्या घटनेनंतर आपली पहिली सोशल मीडिया पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तो घराबाहेर दिसला आहे.

कार्यक्रमासाठी दुबईत पोहोचला सलमान खान!

या व्हिडीओमध्ये सलमान खान कराटे कॉम्बॅटबद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सलमान खान सांगत आहे की, तो २० एप्रिल रोजी दुबईमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. व्हिडीओमध्ये सलमान खान म्हणाला की, ‘म्हणून मी सध्या दुबईत आहे आणि उद्या मी कराटे कॉम्बॅट इव्हेंटमध्ये भाग घेणार आहे. तुम्ही स्वतः पाहिलेल्या घटनेबद्दल मी जास्त काही बोलणार नाही, पण मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. मी या मुलाला ओळखतो जो वयाच्या दुसऱ्या वर्षापासून तायक्वांदो, जुजित्सू शिकत होता आणि मग कालानुरूप आमचा संपर्क तुटला होता.’ व्हिडीओमध्ये या व्यक्तीची चाहत्यांची ओळख करून देण्यापूर्वी सलमान म्हणाला की, ‘आज मला कळाले की, कराटे कॉम्बॅटचा अध्यक्ष तोच मुलगा आहे आणि त्याचे नाव असीम आहे.’

सलीम खान म्हणतात...

घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत स्वत: सलमान खानने अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्या गुन्हेगारांना केवळ प्रसिद्धी हवी आहे, असे सलमानचे वडील सलीम खान म्हणाले. सलीम खान म्हणाले की, ‘यावर बोलण्यात काय अर्थ आहे? हे अशिक्षित लोक काहीही बोलले तरी, मारतील तेव्हाच कळेल. आम्हाला सध्या अतिरिक्त पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी आम्हाला आणि आमच्या परिवाराला सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.’

Whats_app_banner