मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tanning Remove: रोज बेसन वापरल्यामुळे उद्भवू शकतात त्वचेच्या समस्या, हा आहे टॅनिंग दूर करण्याचा उत्तम उपाय

Tanning Remove: रोज बेसन वापरल्यामुळे उद्भवू शकतात त्वचेच्या समस्या, हा आहे टॅनिंग दूर करण्याचा उत्तम उपाय

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 01, 2024 03:05 PM IST

Skin Care Tips: स्किन केअरमध्ये बेसनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु दररोज वापरल्याने त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत जाणून घ्या टॅनिंग दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग

Tanning Remove: रोज बेसन वापरल्यामुळे उद्भवू शकतात त्वचेच्या समस्या, हा आहे टॅनिंग दूर करण्याचा उत्तम उपाय
Tanning Remove: रोज बेसन वापरल्यामुळे उद्भवू शकतात त्वचेच्या समस्या, हा आहे टॅनिंग दूर करण्याचा उत्तम उपाय

Best Way To Remove Tanning: सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेला खूप नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्वचेवर टॅनिंग जमा होते. उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या वाढते. त्यामुळे टॅनिंगपासून सुटका मिळवण्यासाठी बहुतेक लोक घरगुती गोष्टींचा वापर करतात. हे घरगुती फेस पॅक बनवण्यासाठी बेसनाचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की बेसनाचा रोज वापर केल्याने त्वचेला हानी पोहोचते. टॅनिंग दूर करण्यासाठी जर बेसन वापरायचे नसेल तर टॅनिंग दूर करण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या. हा उपाय प्रभावी आहे आणि त्वचेचे टॅनिंग दूर होईल.

ट्रेंडिंग न्यूज

बेसनाचा दररोज वापर केल्याने होईल हानी

रोज वापर केल्याने बेसन आपली त्वचा ड्राय करू शकता. तसेच ड्राय पॅचेस तयार होऊ शकतात. बेसन त्वचेच्या आतील घाण आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी ओळखले जाते. बेसनामध्ये एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात आणि ते नैसर्गिक स्क्रबचे काम करतात. बेसनमध्ये दूध किंवा दही मिक्स करून लावू शकता.

टॅनिंग काढण्याचा उत्तम मार्ग

वास्तविक टॅनिंग काढण्यासाठी बेसनाचा वापर केला जातो. पण त्याचा रोज वापर करणे हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तांदळाचे पीठ वापरू शकता. यासाठी एका बाउलमध्ये १ ते २ चमचे तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात थोडे मध मिक्स करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ करून घ्या. चेहऱ्यावर घाण असेल तर पॅकचा फारसा परिणाम होत नाही. आता या दोन गोष्टी मिक्स करून चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. हा पॅक त्वचेवर काही वेळ म्हणजे साधारण १० ते १५ मिनिटे राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरू शकता. यामुळे टॅनिंग लगेच दूर होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel