मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अभिमान आहे मला, मी मराठी असल्याचा!; 'महाराष्ट्र दिनी' गायत्री दातारने केलेली पोस्ट चर्चेत

अभिमान आहे मला, मी मराठी असल्याचा!; 'महाराष्ट्र दिनी' गायत्री दातारने केलेली पोस्ट चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi
May 01, 2024 11:32 AM IST

आज १ मे रोजी 'महाराष्ट्र दिवस' साजरा केला जातो. त्या निमित्ताने मराठमोळी अभिनेत्री गायत्री दातारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

अभिमान आहे मला, मी मराठी असल्याचा!; 'महाराष्ट्र दिनी' गायत्री दातारने केलेली पोस्ट चर्चेत
अभिमान आहे मला, मी मराठी असल्याचा!; 'महाराष्ट्र दिनी' गायत्री दातारने केलेली पोस्ट चर्चेत

महाराष्ट्र राज्याची स्थापना ही १ मे १९६० रोजी करण्यात आली. आजपासून बरोबर ६४ वर्षांपूर्वी १ मे रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यामुळे हा दिवस मोठा आनंदाने साजरा केला जातो. महाराष्ट्र हे राज्य शूर वीरांचे, संताचे, गडकिल्ल्यांचे आणि कवी-लेखकांचा वारसा जपणारे राज्य म्हणून विशेष ओळखला जातो. त्यामुळे १ मे दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र दिवस, कामागार दिवस आणि मराठी राजभाषा दिवस म्हणून विशेष साजरा केला जातो. अनेक मराठी कलाकार देखील या दिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे गायत्रीची पोस्ट

मराठमोळी अभिनेत्री गायत्री दातारने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सर्वांना 'महाराष्ट्र दिना'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये गायत्री फेटा बांधताना दिसत आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करत तिने, 'छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, श्रीमंत बाजीराव पेशवे, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशी असंख्य थोर व्यक्तिमत्वे ज्या राज्यात जन्माला आली तिथेच जन्म होण्याचे भाग्य मला लाभले. याचा नेहमीच आनंद वाटतो! भाग्यवान आहे मी कारण… या पवित्र भूमीची पुण्याई माझ्या पाठीशी आहे! अभिमान आहे मला, मी मराठी असल्याचा! जय महाराष्ट्र! ता.क.: श्री तुळजा भवानी मंदिरात हा फेटा बांधून सत्कार झाला तेव्हा मन भरुन आलं' असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: “गर्जा महाराष्ट्र माझा!”, १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ऐका ‘ही’ अभिमान गीते

अभिनेत्री हेमांगी कवीने दिल्या शुभेच्छा

अभिनेत्री हेमांगी कवीने खणाचा ड्रेस घालून सोशल मीडियावर हात जोडलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, 'आज १ मे, महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! पुन्हा पुन्हा या महाराष्ट्राच्या लाल- काळ्या मातीत जन्म मिळावा हीच इच्छा! जय महाराष्ट्र!' असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर हेमांगीचा हा फोटो व्हायरल झाला आहे.
वाचा: घरच्यांना सांग सुखरुप निघालो; संकर्षण कऱ्हाडे याने सांगितला राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा

महाराष्ट्र दिवस का साजरा करतात?

महाराष्ट्र दिन दरवर्षी १ मे रोजी आनंदाने साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या स्थापन दिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणूनही ओळखला जातो. १९६० साली या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन नवीन राज्यांची निर्मिती झाली होती. मुंबई शहर हा दोन राज्यांमधील वादाचा मोठा विषय ठरला होता. मुंबईतील बहुतेक लोक मराठी भाषा बोलतात त्यामुळे हे शहर महाराष्ट्र राज्यात आले.
वाचा: 'लोकांना लाज का वाटत नाही', इंटीमेट सीनवरुन ट्रोल करणाऱ्यांना श्वेता तिवारीने सुनावले

IPL_Entry_Point

विभाग