घरच्यांना सांग सुखरुप निघालो; संकर्षण कऱ्हाडे याने सांगितला राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  घरच्यांना सांग सुखरुप निघालो; संकर्षण कऱ्हाडे याने सांगितला राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा

घरच्यांना सांग सुखरुप निघालो; संकर्षण कऱ्हाडे याने सांगितला राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 30, 2024 09:40 AM IST

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने एका मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीचा मजेशिर किस्सा सांगितला आहे. हा किस्सा ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल..

घरच्यांना सांग सुखरुप निघालो; संकर्षण कऱ्हाडे याने सांगितला राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा
घरच्यांना सांग सुखरुप निघालो; संकर्षण कऱ्हाडे याने सांगितला राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा

मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच त्याच्या विनोदाचा अचूक टायमिंग नेहमीच सर्वांची मने जिंकताना दिसतो. नुकताच संकर्षणने सध्याच्या राजकारणावर आणि निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर केलेली एक कविता चांगलीच व्हायरल झाली आहे. त्याची ही कविता ऐकून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याला थेट भेटायला बोलावले. या भेटीचा मजेशीर किस्सा संकर्षणने सांगितला आहे.

संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी यांच्या कवितांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्याने सादर केलेली कविता खूप गाजली होती. ही कविता ऐकून राज ठाकरे यांनी त्याला भेटण्यास शिवतीर्थावर बोलावले. या भेटीचा किस्सा संकर्षणने सांगितला आहे. जेव्हा संकर्षण राज ठाकरे यांना भेटायला गेला तेव्हा त्याच्या वडिलांची धाकधूक वाढली होती. ते सारखे बीपी चेक करत होते.
वाचा: अभिनेत्री जुई गडकरी हिला जेलमध्ये टाकण्याची धमकी, काय आहे नेमकी भानगड? जाणून घ्या

दोन तास आधी शिवाजी पार्कात

'मला राजसाहेबांचा फोन आला होता. त्यांनी मला ११ वाजता शिवतीर्थावर भेटायला बोलावले होते. मी सकाळी साडेसात वाजताच मीरा रोडवरुन निघालो होतो. जवळपास ९च्या सुमारास मी शिवाजी पार्क दाद येथे पोहोचलो. ११ वाजायच्या आधी अडीच तास मी फक्त फेऱ्या मारत होतो. कारण माझ्या मनात केवळ धाकधुक सुरु होती. ते काय बोलतील, काय होणार. माझी तंतरली होती' असे संकर्षण म्हणाला.
वाचा: अभिनेते महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'ची कमाल, तीन दिवसात कमावले कोट्यवधी रुपये

राज ठाकरेंचा मिश्कील स्वभाव

पुढे तो म्हणाला, 'मी त्यांच्या घरात गेल्यावर सर्वात आधी माझ्या फॅमिली ग्रूपवर मेसेज केला की पोहोचलो. तेव्हा पासून माझे बाबा सतत त्यांचा बीपी चेक करत होते. मी हे सगळं जाऊन राज ठाकरेंना सांगितले आणि म्हणलो माझ्या घरच्यांना अगदी धडधडतय. ते पण किती मिश्कील आहेत. मी जेव्हा त्यांच्या घरातून बाहेर पडलो तेव्हा ते मला जाताना म्हणाले की घरच्यांना सांग सुखरुप निघालो.'
वाचा: 'आई-वडील वेगळे झाले तेव्हा मला आनंद झाला', क्षिती जोग पहिल्यांदाच पालकांच्या घटस्फोटावर बोलली

संकर्षणने राज ठाकरे यांच्या पत्नीची देखील भेट घेतली. 'राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या देखील तेव्हा होत्या. आम्ही खूप गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये त्यांनी कुठेही तू असे का लिहिले असे का लिहिले नाहीस. या उलट तुझे खूप चांगले चालले आहे, कुठे राहतोस, तुझ्या घरी कोण असतं, नाटक कसं सुरु आहे, राजकारण, महाराष्ट्र, सिनेमा अशा काही विषयांवार गप्पा झाल्या' असे संकर्षण म्हणाला.

Whats_app_banner