मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Maharashtra Din : “गर्जा महाराष्ट्र माझा!”, १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ऐका ‘ही’ अभिमान गीते

Maharashtra Din : “गर्जा महाराष्ट्र माझा!”, १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ऐका ‘ही’ अभिमान गीते

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 30, 2024 03:19 PM IST

Maharashtra Din : १ मे हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस महाराष्ट्र दिवस, कामगार दिवस आणि मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व सांगणारी काही अभिमान गीते कोणती चला जाणून घेऊया...

“गर्जा महाराष्ट्र माझा!”, १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ऐका ही अभिमान गीते
“गर्जा महाराष्ट्र माझा!”, १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ऐका ही अभिमान गीते

महाराष्ट्र हे राज्य शूर वीरांचे, संताचे, गडकिल्ल्यांचे आणि कवी-लेखकांनी समृद्ध असल्याचे नेहमीच म्हटले जाते. महाराष्ट्र या राज्यात १ मे दिवस हा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. कारण हा दिवस महाराष्ट्र दिवस, कामागार दिवस आणि मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. राज्यात अनेक ठिकाणी हा दिवस साजरा करण्यासाठी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवसाचे महत्त्व सांगणारी अनेक गाणी, कविता देखील आजवर प्रदर्शित झाली आहेत. ही गाणी कोणती चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी|
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा|

'जय जय महाराष्ट्र माझा' हे गाणे १ मे रोजी सर्वत्र ऐकायला मिळते. या देशभक्तीपर गीताचे मूळ बोल राजा बढे यांनी लिहिले आहेत. संगीत श्रीनिवास खळे यांनी या गाण्याला सांगीत दिले आहे. तर लोकगायक कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी गायले आहे.
वाचा: महाराष्ट्र दिनानिमित्त प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा!

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी|
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी|

हे मराठी अभिमानगीत कवी सुरेश भट्ट यांनी लिहिले आहे. तर कौशल इनामदार यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्याला जवळपास ४५० गायकांनी आवाज दिला आहे. तसेच ११२ प्लेबॅक गायक एकत्र आले होते.
वाचा: कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित 'कर्मवीरायण' सिनेमा, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान|
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान
कोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान|

'माझे राष्ट्र महान' हे गाणे लोकगायक कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी गायले आहे. या गाण्याला श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केले आहे. तर या गीताचे बोल चकोर आजगावकर यांचे आहे.

जयोSस्तु ते श्रीमहन्मंगले| शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती| त्वामहं यशोयुतां वंदे

दिवंगत गायिका लता मंगेशकर यांनी गायलेले हे मराठी अभिमानगीत अनेक कार्यक्रमांमध्ये ऐकायला मिळते. मधुकर गोळवलकर यांनी संगीतबद्ध केले आहे. तर गाण्याचे बोल हे विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिले आहेत.
वाचा: घरच्यांना सांग सुखरुप निघालो; संकर्षण कऱ्हाडे याने सांगितला राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे

'हे राष्ट्र देवतांचे' हे स्फूर्तीगीत ग.दि. माडगुळकर यांनी लिहिले आहे. हे गीत राणी वर्मा यांनी कोरसमध्ये गायले आहे. या गाण्याला सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग