आजकाल चित्रपट असो वा मालिका सगळीकडे इंटीमेट सीन्स शूट होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिज किंवा चित्रपटांमध्ये तर सरास इंटीमेट सीन्स असतात. कलाकार देखील इंटीमेट सीन्स देण्यासाठी लगेच तयार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच अतिशय लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीला इंटीमेट सीन्स दिल्यामुळे ट्रोल केले जात आहे. तिने देखील ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
श्वेता तिवारी ही मालिका विश्वातील क्वीन असल्याचे म्हटले जाते. तिने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. श्वेताने वयाची ४० ओलांडली असली तरी ती अतिशय फिट दिसते. तिचे जगभरात लाखो चाहते आहेत. सध्या श्वेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिने एका वेब सीरिजमध्ये इंटीमेट सीन दिला असल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.
वाचा: अभिनेत्री जुई गडकरी हिला जेलमध्ये टाकण्याची धमकी, काय आहे नेमकी भानगड? जाणून घ्या
श्वेताची 'हम तुम और देम' ही सीरिज नुकताच प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये तिने इंटीमेट सीन्स दिले आहेत. हे सीन्स पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यावर श्वेता देखील शांत बसली नाही. तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. 'जे लोक असे सीन्स आवडीने पाहतात, तेच लोक टीका करायला कायम पुढे येतात' असे श्वेता म्हणाली आहे. या सीरिमध्ये श्वेताने अक्षय तिवारीसोबत दिलेल्या इंटिमेट सीन्सची विशेष चर्चा रंगली आहे. या सीन्समुळे श्वेताला ट्रोल करण्यात आले आहे.
वाचा: अभिनेते महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'ची कमाल, तीन दिवसात कमावले कोट्यवधी रुपये
'जे लोक यापेक्षाही अश्लील कंटेट पाहत असतात, तेच लोक ट्रोल करण्यासाठी पुढे येतात. पण हेच लोक जास्त इंटीमेट सीन्स असणारे हॉलिवूड चित्रपट देखील बघतात. पण त्यांना मी दिलेले इंटीमेट सीन्स चालत नाहीत. त्याला ते विरोध करुन हॉलिवूड शो बघतात. बरं पुढे जाऊन हे लोक एकमेकांना तो सीन कसा आहे किंवा कसा वाटला हे ही सांगतात. पण माझ्या सीरिजमधला इंटीमेट सीन त्यांना नकोसा वाटतोय. आपल्या समाजात दोन्ही बाजूंनी बोलणारी लोक आहेत. दुटप्पी भूमिका घेणाऱ्या या लोकांना खरंतर लाज वाटायली पाहिजे' असे श्वेता म्हणाली.
वाचा: 'आई-वडील वेगळे झाले तेव्हा मला आनंद झाला', क्षिती जोग पहिल्यांदाच पालकांच्या घटस्फोटावर बोलली