मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shehzada Teaser : कार्तिक आर्यनच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज; ‘शहजादा’चा दमदार टीझर रिलीज

Shehzada Teaser : कार्तिक आर्यनच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज; ‘शहजादा’चा दमदार टीझर रिलीज

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 22, 2022 05:33 PM IST

Shehzada Teaser : कार्तिक आर्यन आज त्याचा ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने त्याच्या ‘शहजादा’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Kartik Aaryan
Kartik Aaryan

Shehzada Teaser : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आता त्याच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आज (२२ नोव्हेंबर) कार्तिकच्या वाढदिवशी त्याच्या चाहत्यांना अभिनेत्याने एक खास सरप्राईज दिले आहे. कार्तिकच्या आगामी ‘शहजादा’ या चित्रपटाचा टीझर आज रिलीज करण्यात आला आहे. कार्तिक आर्यन आज त्याचा ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने त्याच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘शहजादा’च्या टीझरमध्ये कार्तिक आर्यन साऊथ स्टाईल अॅक्शन करताना दिसत आहे, ज्यामुळे चाहते त्याची तुलना अल्लू अर्जुनशी देखील करत आहेत. कार्तिक आर्यनचा हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या तेलुगु ब्लॉकबस्टर 'अला वैकुंठपुरमलो'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. ५८ सेकंदांच्या या टीझर व्हिडीओमध्ये कार्तिक आर्यन दमदार अॅक्शन करताना दिसत आहे. या टीझर व्हिडीओची सुरुवात एका आलिशान राजवाड्यातून होते. कार्तिक एका घोड्यावर बसून या महालात प्रवेश करतो. यानंतर ‘जब बात फॅमिली की आए तो डिस्कशन नहीं करते हैं, तब अॅक्शन करते हैं’, या दमदार संवादासह कार्तिक गुंडांसोबत दोन हात करताना दिसतो. चित्रपटाचा हा टीझर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे.

‘शहजादा’चा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर आता चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाशी संबंधित अपडेट जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या वाढदिवशी मिळालेल्या या खास सरप्राईजमुळे चाहते देखील खूश झाले आहेत.

कार्तिक आर्यन हा सध्या नव्या चित्रपटांच्या कामात अतिशय व्यस्त आहे. २०२२ हे वर्ष कार्तिकसाठी खूपच लकी ठरले आहे. यावर्षी त्याचा 'भूल भुलैया २' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. यानंतर कार्तिककडे चित्रपटांची रांग लागली. ‘फ्रेडी’, ‘शहजादा’, ‘हेरा फेरी ३’ अशा बहुचर्चित चित्रपटांमध्ये कार्तिक मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग