मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Sanjay Raut: गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; मोदींनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला संजय राऊत यांचं उत्तर

Sanjay Raut: गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; मोदींनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला संजय राऊत यांचं उत्तर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 30, 2024 03:06 PM IST

Sanjay Raut on PM Narendra Modi : शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका करत महाराष्ट्रातील भटकती आत्मा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील सभेत बोलले होते. मोदींच्या या टीकेला खासदार संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

'गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय'; संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर जहरी टीका
'गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय'; संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर जहरी टीका

Sanjay Raut on PM Narendra Modi : राज्यात लोकसभा निवडणूक प्रचारात आरोपांच्या जोरदार फैरी झडत असल्याचे दिसत आहे. पुण्यात सोमवारी झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना अतृप्त भटकटी आत्मा अशी टीका केली होती. ही टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. यावर महाविकास आघाडीचे नेते आता प्रत्युत्तर देऊ लागले आहे. खासदार संजय राऊत यांनी देखील मोदी यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. संजय राऊत म्हणाले की, मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे. हा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Amravati double murder: अमरावतीत जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड! कोयत्याने वार करून शेजाऱ्याने केली आई, मुलाची हत्या

काय म्हणाले संजय राऊत ?

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. राऊत म्हणाले, महाराष्ट्र अतृप्त आत्मे भटकत असले तरीही राज्य त्यांना घाबरत नाही महाराष्ट्रात अंधश्रद्धा, फेकाफेकी, ढोंगीपणा चालत नाही. महाराष्ट्र हा पवित्र आत्म्यांचा देश आहे. मोदी हेच एक अतृप्त आत्मा आहेत. हा आत्मा सध्या राज्यात भटकत आहे. ते राज्याचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत, असे अनेक आत्मे महाराष्ट्रात साडेचारशे वर्षांपासून भटकत आहेत. ज्यांनी त्यांना गाडले आहेत.

राऊत म्हणाले, या मातृभूमित छत्रपती शिवरायांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक सुपुत्र जन्माला आले आहेत. मोदीजी पुण्यात होते. पण, त्यांनी डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख पण केला नाही. कारण त्यांना डॉक्टर आंबेडकरांवर राग आहे. त्यांना संविधान बदलायचे आहेत म्हणून हे आत्मे सध्या राज्यात भटकत आहेत. मोदी काय बोलत आहे, त्याकडे लक्ष न देता राज्यासाठी ज्या १०५ जणांनी बलिदान दिले ते मोदींना शाप देणार आहेत. मोदींनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं जेवढे नुकसान केले नसेल तेवढे कुणीच केलेले नाही.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झालं आहे, स्वप्न पूर्ण न झाल्यानं त्यांचा आत्मा भटकतोय, त्यांनी आपला स्वत:चा पक्षही अस्थिर केला आहे. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. ४५ वर्षांपूर्वी येथील एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली. अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत. हा अतृप्त आत्मा १९९५ मध्ये शिवसेना-भाजपाचं सरकार अस्थिर करु पाहत होता. तर २०१९ साली या आत्म्याने काय केलंय हे राज्याने पहिले आहे, अशी टीका मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली होती.

WhatsApp channel