मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PBKS Vs RCB : 'करो या मरो'च्या सामन्यात आरसीबीची प्रथम फलंदाजी, दोन्ही संघांत मोठे बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन

PBKS Vs RCB : 'करो या मरो'च्या सामन्यात आरसीबीची प्रथम फलंदाजी, दोन्ही संघांत मोठे बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 09, 2024 07:07 PM IST

Punjab Kings Vs Royal Challengers Bangalore Match : आयपीएल २०२४ मध्ये आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने आहेत. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

PBKS Vs RCB : 'करो या मरो'च्या सामन्यात आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा प्लेइंग इलेव्हन
PBKS Vs RCB : 'करो या मरो'च्या सामन्यात आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा प्लेइंग इलेव्हन

इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ५८ व्या सामन्यात आज (९ मे) पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने आहेत. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात  पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पंजाबचा कर्णधार सॅम करनने प्लेइंग-इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. कागिसो रबाडाच्या जागी लियाम लिव्हिंगस्टोनचा प्लेईंग-११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी बेंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसनेही प्लेइंग-११ मध्ये एक बदल केला. मॅक्सवेलच्या जागी लोकी फर्ग्युसनचा प्लेइंग-११ मध्ये समावेश केला आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, रिले रौसो, शशांक सिंग, सॅम करन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग, विद्वत कावेरप्पा.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.

आज पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल

मुंबई इंडियन्सचा संघ बुधवारी (८ मे) प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. त्याच वेळी, आता एलेमिनेशनचा टप्पा सुरू झाला आहे. आजच्या सामन्यात पराभूत होणारा संघही आयपीएलमधून बाहेर पडेल. पराभूत संघाचे १२ सामन्यांतून ८ गुण असतील आणि ते जास्तीत जास्त १२ गुणांपर्यंत पोहोचण्यास सक्षम असतील, जे प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी पुरेसे नसतील. विजेत्या संघाच्या आशा जिवंत राहतील. मात्र, त्याला इतर संघांच्या निकालावरही त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे.

IPL_Entry_Point