मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PBKS vs RCB Live Streaming: पंजाब- बंगळुरूमध्ये आज सामना; कधी, कुठे पाहायचा लाईव्ह

PBKS vs RCB Live Streaming: पंजाब- बंगळुरूमध्ये आज सामना; कधी, कुठे पाहायचा लाईव्ह

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 09, 2024 09:07 AM IST

Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Live Streaming: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहायचा, हे जाणून घेऊयात.

आयपीएल २०२४: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज लढत पाहायला मिळत आहे.
आयपीएल २०२४: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज लढत पाहायला मिळत आहे. (PTI)

IPL 2024: आयपीएलमध्ये गुरुवारी (०९ मे २०२४) पंजाब किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पंजाब किंग्ज ११ सामन्यांत ८ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ११ सामन्यांत ८ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात शिखर धवन संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

SRH vs LSG : हैदराबादने अवघ्या ५८ चेंडूत गाठलं १६६ धावांचे लक्ष्य, ट्रॅव्हिस हेड-अभिषेक शर्माची तुफानी फलंदाजी

पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज (०९ मे २०२४) आयपीएलमधील ५८वा सामना खेळला जाईल. हा सामना धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, पंजाब आणि बंगळुरू यांच्यातील सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकतात.

DC VS RR : खेळाडूंच्या वादात दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाची उडी, पार्थ जिंदाल सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ:

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजयकुमार विशक, महिपाल लोमरोर , अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, आकाश दीप, हिमांशू शर्मा, रीस टोपले, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, अल्झारी जोसेफ, मनोज भंडागे, सौरव चौहान, राजन कुमार.

पंजाब किंग्जचा संघ:

प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकिपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, हरप्रीत सिंग भाटिया, तनय त्यागराजन, विद्वथ कवेरप्पा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, शिखर धवन, ख्रिस वोक्स, अथर्व तायडे, नॅथन एलिस, शिवम सिंग, प्रिन्स चौधरी, विश्वनाथ सिंह.

IPL_Entry_Point