मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 30, 2024 11:12 AM IST

Ola Cabs layoffs : ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांनी राजीनामा दिला असून ते राइड-हेलिंग फर्ममध्ये रुजू झाले. सध्या ओला कॅब्समध्ये अनेक बदल करण्यात येत असून याच बदलांचा एक भाग म्हणून कंपनीतील १० कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे.

'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा
'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

Ola Cabs layoffs : ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांनी अवघ्या चार महिन्यांत कंपनीला रामराम केला आहे. त्यांनी ओला कॅब्सचा सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या कंपनी अनेक बदल करत असून यामुळे किमान १० टक्के कर्मचाऱ्यांना कंपनी काढून टाकण्याची शक्यता आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

मनीकंट्रोलने काही कर्मचाऱ्यांचा हवाला देऊन हे वृत्त दिले आहे. हेमंत बक्षी हे जानेवारीमध्ये राईड-हेलिंग फर्ममध्ये रुजू झाले आहेत. ओला कॅब्सच्या पुनर्रचनेमुळे अनेक पदे निरर्थक होणार आहे. याचा परिमाण कंपनीच्या १० टक्के कामगारांवर होणार असून त्यांना काढून टाकण्यात येणार आहे.

Netanyahu Arrest Warrant : बेंजामिन नेतान्याहूंना होणार अटक! आयसीसीच्या वॉरंटमुळे अमेरिका संतप्त, दिला 'हा' इशारा

तर एका दुसऱ्या अहवालानुसार, ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी हे कंपनीबाहेरील संधी शोधण्यासाठी ओला कॅब्समधून बाहेर पडणार आहेत. त्यांच्या राजीमान्यानंतर अग्रवाल हे त्यांची धुरा काही दिवस सांभाळणार आहेत. कंपनीत लवकरच नव्या सीईओची नियुक्ती केली जाणार आहे.

घरच्यांना सांग सुखरुप निघालो; संकर्षण कऱ्हाडे याने सांगितला राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा

ओला कॅबमध्ये होणार हे बदल

ओला कॅब्सने आयपीओसाठी गुंतवणूक बँकांशी प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. यानंतर ही बातमी पुढे आली आहे. गेल्या एका महिन्यात, ओला कॅब्सने सीएफओ (माजी P&G) म्हणून कार्तिक गुप्ता आणि सीबीओ (माजी हॉटस्टार) म्हणून सिद्धार्थ शकधर यांच्यासह अनेकांना नियुक्त केले आहे.

Mumbai Train Accident : मुंबईच्या 'लाईफ लाईन'ने घेतला दोघांचा बळी; डोंबिवलीतील तरुण तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू

ओला कॅबने आंतरराष्ट्रीय कामकाज केले बंद

कंपनीने काही देशांमधील आपला गाशा गुंडाळला आहे. या बाबत कंपनीने म्हटले की. त्यात आधी म्हटले होते, “आम्ही आमच्या प्राधान्यक्रमांचे पुनर्मूल्यांकन केले असून यूके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेला राइड-हेलिंग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आम्ही भारतात आमची सेवा देण्याचा मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे.”

ओला कॅबची आर्थिक स्थिती कशी आहे?

ओला च्या मोबिलिटी व्यवसायाने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये २,१३५ कोटींचा आर्थिक नफा मिळवला. जो जवळपास ५८ टक्क्यांनी वाढला आहे. २०२२च्या आर्थिक वर्षात कंपनीने ६६ कोटी EBITDA तोटा सहन केल्यावर कंपनीने पहिल्यांदाच २५० कोटींचा सकारात्मक EBITDA नोंदवला.

WhatsApp channel

विभाग