Benjamin Netanyahu Arrest Warrant : गाझा पट्टीत इस्रायलचे सुरू असलेल्या भीषण हल्ल्यामुळे अनेक सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हे हल्ले थांबवण्याचे आवाहन करून देखील इस्रायलचे गाझा पट्टीवरील हल्ले सुरूच आहेत. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने दिला असून त्याच्या अटकेसाठी अटक वॉरंट देखील जारी केले आहे.
नेतन्याहू यांच्या सोबतच इस्रायलचे संरक्षण मंत्री आणि आयडीएफ प्रमुख यांच्या विरोधात देखील हे यांच्या विरोधातही हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या (आयसीसी) या निर्णयामुळे अमेरिका खवळली असून असे झाल्यास आयसीसीला गंभीर परिणाम भोगावे लागेल असा धमकीवजा इशारा अमेरिकेने दिला आहे.
गाझा पट्टीमध्ये इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे मृतांची संख्या ३४ हजारांच्या पुढे गेली आहे. गाझामध्ये मारल्या गेलेल्यांमध्ये बहुतेक निष्पाप मुले आणि महिला आहेत. यूएनसह अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी गाझावरील जमिनीवरील आणि हवाई हल्ले थांबवण्यासाठी इस्रायलला आवाहन केले. या विरोधात संयुक्त राष्ट्र संघात अनेक ठराव देखील करण्यात आले. मात्र, नेतान्याहू नमले नाहीत. गाझावरील इस्रायलचे हल्ले हे सुरूच आहेत.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या कृतीमुळे अमेरिका संतत्प झाली आहे. दोन्ही पक्षांच्या खासदारांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला गर्भित इशारा दिला आहे. इस्रायलचे पंतप्रधान किंवा इस्रायली लष्करी अधिकाऱ्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केल्यास या कारवाईचा अमेरिका बदला घेईल, असे एक्सिओसच्या अहवालात म्हटले आहे. आयसीसीने नेतन्याहू, इस्रायलचे संरक्षण मंत्री आणि आयडीएफचे प्रमुख यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी आयसीसी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे अहवालात म्हटले आहे. हाऊस फॉरेन अफेयर्स कमिटीचे अध्यक्ष मायकेल मॅकॉल यांनी सांगितले की आयसीसी हे विधेयक मंजूर करण्याच्या तयारीत आहे. मात्र, अमेरिकन अधिकाऱ्यांना वाटते की आयसीसीला अमेरिकेने दिलेल्या या इशाऱ्या नंतर ते त्यांचा निर्णय बदलतील. गाझा युद्धाबाबत नेतन्याहू यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केल्याबद्दल अमेरिकन सभागृहाचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी आयसीसीचा निषेध केला आहे.
जॉन्सन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "आयसीसी जाणीवपूर्वक इस्रायलला लक्ष्य करत आहे. हे कृत्य संतापजनक आहे. नेतन्याहू आणि इतर वरिष्ठ इस्रायली अधिकाऱ्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी करणे चुकीचे आहे. आयसीसीच्या अशा बेकायदेशीर कारवाईमुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला थेट हानी पोहोचवत आहे. या निर्णया विरोधात जर बायडन प्रशासनाने कारवाई केली नाही तर आय.सी.सी अमेरेकीच्या अधिकांवरही कारवाई करेल. यामुळे अमेरिकेचे र्वभौमत्व धोक्यात येऊ शकते.
आयसीसीने कोणत्याही देशाच्या सर्वोच्च नेत्यावर अशी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी आयसीसीने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध युक्रेन युद्धाच्या आरोपावरून अटक वॉरंटही जारी केले आहे. या कारवाई अंतर्गत, पुतीन यांना आयसीसीच्या नियमांचे पालन करणाऱ्या कोणत्याही देशाला भेट दिल्यावर त्यांना अटक होऊ शकते.