मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bank Holiday may 2024 : मे महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार?; पाहा बँक हॉलिडेची यादी

Bank Holiday may 2024 : मे महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार?; पाहा बँक हॉलिडेची यादी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 29, 2024 02:50 PM IST

Bank Holiday may 2024 : मे महिना शाळांच्या सुट्ट्यांचा असला तरी इतर ठिकाणी कामं सुरूच राहतात. या महिन्यात बँका १० दिवस बंद राहणार आहेत.

Bank Holiday : मे महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार?; पाहा बँक हॉलिडेची यादी
Bank Holiday : मे महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार?; पाहा बँक हॉलिडेची यादी

Bank Holiday may 2024 : बुधवारपासून सुरू होणाऱ्या मे महिन्यात किमान १० दिवस बँका बंद राहणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियासह सर्व राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये मे महिन्यात दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारच्या सुट्ट्यांसह किमान १० दिवस कोणतंही कामकाज होणार नाही. याशिवाय मतदानाच्या दिवशी संंबंधित मतदारसंघातील बँकांसह सर्व कार्यालयांना सुट्टी असेल. काही राज्यांमध्ये स्थानिक सणांसाठी सुट्ट्याही असू शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

बँकांचे सुट्टीचे कॅलेंडर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि संबंधित राज्य सरकारं ठरवतात. बँकांच्या प्रादेशिक सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांच्या स्थानिक चालीरीतींवर अवलंबून असतात.

मे २०२४ मधील सुट्ट्यांची संपूर्ण यादी

१ मे - या दिवशी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रात बँका बंद राहतील.

८ मे - पश्चिम बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.

१० मे : अक्षय्य तृतीया सणानिमित्त बँका बंद राहतील.

२३ मे : बुद्ध पौर्णिमेनिमित्त बँका बंद राहतील.

दुसऱ्या शनिवारी ११ मे रोजी बँका बंद राहतील

चौथ्या शनिवारी २५ मे रोजी बँका बंद राहतील.

रविवार सुट्ट्या : ४, १२, १८ आणि २६ मे

ऑनलाइन बँकिंग सुविधा, एटीएमवर कोणताही परिणाम होणार नाही

या सुट्टीच्या दिवशीही बँक ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग आणि एटीएम सुविधा मिळत राहतील. बँकेच्या सर्व सुट्ट्या आणि आठवड्याच्या शेवटी ऑनलाइन बँकिंग सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहतील. महत्त्वाच्या व्यवहारांसाठी बँकांची वेबसाइट, मोबाइल ॲप किंवा एटीएम वापरून ग्राहकांना बँकेशी संबंधित कामं सहज करता येतील.

आतापासूनच करा सुट्ट्यांचं नियोजन

मे महिना हा शाळांच्या सुट्ट्यांचा महिना असतो. या महिन्यात अनेक लोक थंड हवेच्या ठिकाणी किंवा गावाला जायचे प्लान आखत असतात. यंदा उकाडा देखील प्रचंड असल्यामुळं लोक आपल्या कार्यालयीन सुट्ट्या पाहून प्लान करत आहेत. अशा लोकांसाठी बँक हॉलिडेची ही यादी महत्त्वाची ठरू शकते. अक्षय्य तृतीया सणाला जोडून शनिवार, रविवार येत असल्यानं सुट्टीसाठी तीन दिवस मिळू शकतात. त्याशिवाय एखादी सुट्टी मारूनही एखादा प्लान आखता येऊ शकतो.

 

WhatsApp channel

विभाग