MDH Spices issue : एमडीएच मसाल्यात आढळला टायफॉइडचा बॅक्टेरिया! अमेरिकेनं तातडीनं रोखला आयात होणारा मोठा साठा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  MDH Spices issue : एमडीएच मसाल्यात आढळला टायफॉइडचा बॅक्टेरिया! अमेरिकेनं तातडीनं रोखला आयात होणारा मोठा साठा

MDH Spices issue : एमडीएच मसाल्यात आढळला टायफॉइडचा बॅक्टेरिया! अमेरिकेनं तातडीनं रोखला आयात होणारा मोठा साठा

Apr 29, 2024 10:41 AM IST

MDH spices issue : मसाल्यात टायफॉइडचे बॅक्टेरिया तसेच मानवी शरीरास धोकादायक असणारी अनेक पदार्थ आढळल्यामुळे अमेरिकेने एमडीएच मासल्याची तब्बल ३१ शिपमेन्ट रोखली आहे.

एमडीएचच्या मसाल्यात आढळले टायफॉइडचे बॅक्टेरिया! अमेरिकेने रोखला ३१ टक्के माल
एमडीएचच्या मसाल्यात आढळले टायफॉइडचे बॅक्टेरिया! अमेरिकेने रोखला ३१ टक्के माल

MDH spices issue : अमेरिकेच्या सीमाशुल्क विभागाने एमडीएच मसाल्यात टायफॉइडसाठी कारणीभूत ठरणारा साल्मोनेला हा विषाणू आढळल्याने गेल्या सहा महिन्यांत एमडीएच प्रायव्हेट लिमिटेडने निर्यात केलेल्या सर्व मसाल्यांच्या शिपमेंट्सपैकी ३१ टक्के शिपमेन्ट रद्द केल्या आहेत. गेल्या वर्षी पाठवण्यात आलेला हा माल न स्वीकारण्याच्या घटना वाढल्या आहेत. ऑक्टोबर २०२३ पर्यंत हा आकडा १५ टक्के होता. तो आता ३० टक्के ऐवढा झाला आहे.

chhattisgarh accident : पीकअप-बसच्या भीषण अपघात ३ मुलांसह १० जण जागीच ठार; लग्नसमारंभ आटोपून घरी येतांना काळाचा घाला

एमडीएच मसाल्यात मानवी शरीरास घातक असे पदार्थ आढळल्याने एमडीएचचा माल रद्द करण्याच्या घटना वाढल्या आहेत. या मसाल्यात अलीकडच्या काळात टायफॉइड होण्यास कारणीभूत ठरणारा साल्मोनेला हा विषाणू आढळल्याचा आरोप होत होता. तर सिंगापूर आणि हाँगकाँग या दोन्ही देशांनी एमडीएच मसाल्यांमध्ये कार्सिनोजेनिक कीटकनाशकांच्या मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे आढळल्याने एमडीएचचा माल घेण्यास नकार दर्शवला होता.

मुंबईत भाजपने तीनही विद्यमान खासदारांचा पत्ता का कट केला? कारण आलं समोर

ऑक्टोबर २०२३ पर्यंतच्या सर्व एमडीएचच्या शिपमेंटपैकी जवळपास एक तृतीयांश किंवा ११ शिपमेंट्स अमेरिकेने या कारणामुळे रद्द केल्या आहेत. "मसाले, फ्लेवर्स आणि मीठ" म्हणून वर्गीकृत उत्पादनांचा समावेश यात समावेश आहे. यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या माहितीवरून असे दिसून आले आहे की ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान एमडीएचचा माल नाकारण्याच्या दर हा १५ टक्के होता. याव्यतिरिक्त, ऑक्टोबर २०२० पासून नाकारलेली सर्व MDH निर्यात शिपमेंटमधील मालात साल्मोनेला हा विषाणू आढळला होता.

Pune Traffic Change : पुणेकरांनो, आज घराबाहेर पडण्याआधी हे वाचा! पंतप्रधान मोदी यांच्या सभेमुळे वाहतुकीत मोठा बदल

काय आहे साल्मोनेला ?

कोणत्याही खाद्यपदार्थात साल्मोनेला बॅक्टेरिया असल्यास आणि त्याचे सेवन केल्यास, यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. अन्न नीट शिजवून न घेतल्यास आतड्यांचे आजार देखील होऊ शकतात. साल्मोनेलामुळे प्रामुख्याने टायफॉइड हा आजार होऊ शकतो. साल्मोनेला विषाणू हा अंडी, गोमांस, कच्चे चिकन आणि फळे आणि भाज्या यात आढळतो. एका अन्न सुरक्षा तज्ज्ञाने सांगितले की, जर तुम्ही माल तयार करण्यापासून ते पॅकेजिंगपर्यंतची निगा राखली नाही तर साल्मोने या विषाणूची वाढ होऊ शकते. एफडीएने जानेवारी २०२२ मध्ये एमडीएच च्या मालाची आणि कारखान्याची तपासणी केली होती. यावेळी त्या ठिकाणी स्वच्छतेच्या सुविधा नसल्याचे आढळून आले होते.

सध्याच्या अमेरिकच्या आर्थिक वर्षात (ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४) एव्हरेस्टच्या सर्व निर्यात होणाऱ्या शिपमेंटपैकी ०.३ टक्के शिपमेन्ट अमेरिकेने नाकारल्या आहेत. गेल्या आर्थिक वर्षात हा दर ३ टक्के होता. ऑक्टोबर २०२३ पासून एकूण ५ शिपमेंट अमेरिकेने नाकारल्या आहेत.

नाकारलेल्या उत्पादनांचे काय होते?

एफडीए मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर एखाद्या मालाची शिपमेंट नाकारण्यात आली असेल तर आयातदार हा माल नष्ट करू शकतो. एफडीए नाकारल्या मालाचे नंतर काय केले जाते या बाबत माहिती ठेवत नाही.

एमडीएच’ने काय केला खुलासा?

भारतीय मसाला निर्माता एमडीएच कंपनीने सांगितले की, “एमडीएचचे उत्पादने वापरासाठी सुरक्षित आहेत. तसेच कंपनीला अद्याप त्यांच्या उत्पादनांमध्ये कथित दूषिततेबद्दल हाँगकाँग किंवा सिंगापूरमधील अन्न सुरक्षा नियामक प्राधिकरणाकडून कोणताही संवाद प्राप्त झालेला नाही”. एमडीएचने रविवारी एका निवेदनात म्हटले, “आम्ही आमच्या खरेदीदारांना आणि ग्राहकांना खात्री देतो, आम्ही आमच्या मसाल्यांच्या साठवणीच्या प्रक्रिया आणि पॅकिंग प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर इथिलीन ऑक्साईडचा वापर करत नाही”, असे कंपनीने म्हटले. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

Whats_app_banner