Realme Narzo 70 Series Sale: कमी किंमतीत जास्त फीचर्स असलेल्या स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी रिअलमीच्या रिअलमी नार्झो ७० सीरिजमधील स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. या सीरिजमध्ये रिअलमी नार्झो ७० एक्स 5G आणि रिअलमी ७० 5G या दोन स्मार्टफोनचा समावेश आहे. रिअलमी कंपनीने या दोन स्मार्टफोनच्या सेलची घोषणा केली आहे. या सेलअंतर्गत हे दोन्ही स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हा सेल फक्त दोन तासांसाठी मर्यादीत असेल.
रिअलमी प्लॅश सेल आज दुपारी १२ वाजल्यापासून सुरु झाला. रिअलमी कंपनीची अधिकृत वेबसाईट आणि अमेझॉनद्वारे या दोन्ही स्मार्टफोनची खरेदी करता येणार आहे. रिअलमी नार्झो ७० एक्स 5G (४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज) स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकंना १००० रुपयांचे कूपन मिळणार आहे. तर, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटच्या खरेदीवर ग्राहकांना १५०० रुपयांचे कूपन मिळत आहे. याशिवाय, रिअलमी नार्झो ७० 5G च्या दोन्ही व्हेरिएंटच्या (६ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज) खरेदीवर १००० रुपयांचे कूपन मिळत आहे.
रिअलमी नार्झो ७० एक्स 5G ची (४ जीबी रॅम आणि १२८ जीबी) किंमत ११ हजार ९९९ रुपये इतकी आहे. परंतु, १००० रुपयांच्या ऑफर्समुळे हा स्मार्टफोन ग्राहकांना अवघ्या १० हजार ९९९ खरेदी करता येणार आहे. रिअलमी नार्झो ७० एक्स 5G च्या ६ जीबी रॅम आणि १२८ स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनोची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे.
रिअलमी नार्झो ७० 5G (६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज) किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची १६ हजार ९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन मिस्टी फॉरेस्ट ग्रीन आणि स्नो माऊंटन ब्लू कलर व्हेरिएंट या दोन रंगात उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी रिअलमीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.