मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC Exam : राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर; लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक आलं समोर

MPSC Exam : राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर; लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक आलं समोर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 10, 2024 03:25 PM IST

Mpsc Exam Date : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा येत्या ६ जुलै रोजी होणार आहे. आधी ही परीक्षा २८ एप्रिल रोजी होणार होती. मात्र मराठा आरक्षणामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती.

राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर
राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २८ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा (Maharashtra state services pre exam 2024)  मराठा आरक्षणामुळे स्थगित करण्यात आली होती. आता ही परीक्षा शनिवार, दिनांक ६ जुलै, २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांचा सुधारित तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे, अशी माहिती आयोगाने निवेदनाद्वारे दिली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

एमपीएससीकडून राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी २९ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. २७४ पदांसाठी २८ एप्रिल २०२४ रोजी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला आणि स्वतंत्र १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २८ एप्रिल रोजी झालेली परीक्षा स्थगित करण्यात आली होती. 

मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या आरक्षण निश्चिती करण्यात आलं आहे. त्यानुसार सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आलं आहे. आयोगाच्या २१ मार्च २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आता शनिवार ६ जुलै २०२४ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४  ची जाहिरात २९ डिसेंबर, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांकरीता जाहिरात क्रमांक ४१४/२०२३ प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा दिनांक २८ एप्रिल, २०२४ रोजी नियोजित करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ अंमलात आल्याने या अधिनियमातील तरतुदी विचारात घेता आयोगाच्या दिनांक २१ मार्च, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ तसेच दिनांक १९ मे, २०२४ रोजी नियोजित समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. याची तारीख नव्याने जाहीर करण्यात आलेली आहे.

IPL_Entry_Point

विभाग