मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Avatar 2 Collection: ‘अवतार २’ची बॉक्स ऑफिसवर हवा; प्रदर्शनाआधीच जमवलाय ‘इतका’ गल्ला!

Avatar 2 Collection: ‘अवतार २’ची बॉक्स ऑफिसवर हवा; प्रदर्शनाआधीच जमवलाय ‘इतका’ गल्ला!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 13, 2022 12:59 PM IST

Avatar 2 : ‘अवतार’ या चित्रपटाचा पहिला भाग २००९मध्ये रिलीज झाला होता. तर, आता १३ वर्षांनी या चित्रपटाचा पुढचा भाग अर्थात ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ रिलीज होणार आहे.

Avatar 2
Avatar 2

James Cameron, Avatar 2 Collection:अवतार’ या चित्रपटाचा सिक्वेल अर्थात ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट रिलीज होण्यासाठी आता अवघे तीन दिवस उरले आहे. मात्र, या आधीच ‘अवतार २’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. देशातच नव्हे, तर जगभरात या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. जगभरातील चाहत्यांमध्ये ‘अवतार २’ या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो. याचे अंदाजे आकडे आता समोर आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

केवळ इंग्रजीच नाही, तर हिंदी भाषेतही या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळत आहे. भारतातही या चित्रपटाची तब्बल दोन लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार, हे आधीच स्पष्ट झालं आहे. जेम्स कॅमेरुन यांच्या 'अवतार २' या चित्रपटाच्या रिलीजला अजून तीन दिवस बाकी आहेत. परंतु, याआधीच 'अवतार २' ने करोडोंची कमाई केली आहे. ओपनिंग वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करू शकतो, याचा अंदाज आता वर्तवण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट ओपनिंग वीकेंडला किमान १५० मिलियन डॉलर कमवू शकतो. भारतातही या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगने चांगला गल्ला जमवला आहे. जगभरातील चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट बघत आहेत. येत्या १६ डिसेंबरला हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘अवतार’ या चित्रपटाचा पहिला भाग २००९मध्ये रिलीज झाला होता. तर, आता १३ वर्षांनी या चित्रपटाचा पुढचा भाग अर्थात ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ येत्या १६ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने तब्बल २० हजार कोटींची कमाई करत कलेक्शनचे रेकॉर्ड मोडले होते. आता हा सिक्वेल देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

IPL_Entry_Point

विभाग