मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Infinix GT 20 Pro: १०८ मेगापिक्सल कॅमेरा, २५६ जीबी स्टोरेज; लॉन्चिंगपूर्वीच इन्फिनिक्स जीटी २० प्रोमधील फीचर्स लीक

Infinix GT 20 Pro: १०८ मेगापिक्सल कॅमेरा, २५६ जीबी स्टोरेज; लॉन्चिंगपूर्वीच इन्फिनिक्स जीटी २० प्रोमधील फीचर्स लीक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 25, 2024 10:06 PM IST

Infinix GT 20 Pro Features Leak: लॉन्चिंगपूर्वीच इनफिनिक्स जीटी 20 प्रो स्मार्टफोनमधील फीचर्स लीक झाले आहेत.

Check out what’s coming to the new Infinix GT 20 Pro.
Check out what’s coming to the new Infinix GT 20 Pro. (HT Tech)

Infinix GT 20 Pro Renders Leak Online Ahead of Launch: इनफिनिक्सच्या आगामी गेमिंग स्मार्टफोन इनफिनिक्स जीटी २० प्रोच्या स्पेसिफिकेशन्स, डिझाइन, फीचर्सबद्दल माहिती लीक झाली. गेल्या वर्षी कंपनीने मिड- रेंज इनफिनिक्स जीटी १० प्रो ला एक शक्तिशाली गेमिंग स्मार्टफोन म्हणून घोषित केले, ज्याने मोबाइल गेमर्समध्ये बरेच आकर्षण मिळवले होते. आता नवा स्मार्टफोन इनफिनिक्स जीटी २० प्रो लवकरच लॉन्च होणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

टिप्सटर पारस गुगलानी यांच्या अहवालानुसार, इनफिनिक्स जीटी २० प्रोचे रेंडर्स ऑनलाइन समोर आले आहेत जे पेंटागॉनच्या आकाराचे कॅमेरा मॉड्यूल, सायबर मेचा डिझाइन आणि पारदर्शक प्रभावासह रियर पॅनेलसह पूर्ववर्तीसारखेच मॉडेल डिझाइन दर्शवितात. इनफिनिक्स जीटी २० प्रो पुढील महिन्यात मलेशियात लॉन्च होण्याची शक्यता आहे. मात्र, हा स्मार्टफोन भारतात कधी लॉन्च होईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.या स्मार्टफोनचे कलर ऑप्शन आधीच्या व्हेरियंटसारखेच दिसत असले तरी या वर्षी यात अतिरिक्त कलर व्हेरियंटची भर पडू शकते.

इनफिनिक्स जीटी २० प्रो स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि एचडी + रिझोल्यूशनसह ओएलईडी डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी ८२०० चिपसेटद्वारे संचालित असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम/ २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटसह बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

OnePlus 11: वनप्लस ११ स्मार्टफोन २० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, अ‍ॅमेझॉनची ऑफर!

इनफिनिक्स जीटी २० प्रो मध्ये १०८ एमपी ओआयएस ट्रिपल रियर कॅमेरा आणि ३२ एमपी सेल्फी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ वर आधारित १४ एक्सओएसवर चालणार आहे. यात ५ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी असेल आणि ४५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. इनफिनिक्स जीटी २० प्रो सिल्व्हर, ब्लू आणि ऑरेंज अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध होऊ शकतो.

इनफिनिक्स जीटी 20 प्रो ची किंमत

मलेशियामध्ये इनफिनिक्स जीटी २० प्रो ची किंमत आरएम १२९९ आरएम म्हणजेच भारतात अंदाजे २२ हजार रुपये असण्याची शक्यता आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत २० हजार ते २५ हजार रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel

विभाग