मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL: एका मोसमात ९४ सामने! BCCI चा फायदा, पण आयपीएलची लोकप्रियता घटणार?

IPL: एका मोसमात ९४ सामने! BCCI चा फायदा, पण आयपीएलची लोकप्रियता घटणार?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 09, 2022 04:16 PM IST

बीसीसीआय प्रत्येक दोन मोसमानंतर आयपीएलमधील सामन्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे.

ipl
ipl

आयपीएलच्या (ipl) येत्या मोसमापासून सामन्यांची संख्या वाढू शकते.  आयपीएलमध्ये २०२७ पर्यंत एका मोसमात ९४ सामने खेळवले जाऊ शकतात. असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. आयपीएल २०२२ मध्ये एकूण ७४ सामने खेळले गेले होते. एका मोसमातील सामन्यांची ही सर्वात मोठी संख्या आहे. यापूर्वी २०२१ च्या मोसमात ६० सामने झाले होते. 

मात्र, आता २०२३-२०२७ या मोसमात आयपीएलमध्ये एकूण ४१० सामने खेळले जाऊ शकतात. बीसीसीआय प्रत्येक दोन मोसमानंतर आयपीएलमधील सामन्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२३ आणि २०२४ या सीझनमध्ये ७४ सामने खेळवले जातील. यानंतर, पुढील दोन मोसमात (२०२५-२०२६) ८४ सामने खेळवले जातील. यानंतर आयपीएल २०२७ मध्ये ९४ सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. roपरंतू, बीसीसीआय एका सीझनमधील सामन्यांची संख्या केवळ ८४ पर्यंतच ठेवण्याच्या विचारात आहे, कारण अधिक सामन्यांमुळे स्पर्धा लांबत जाते आणि प्रेक्षकांची आवड कमी होण्याचा धोकाही निर्माण होतो.

विशेष म्हणजे, बीसीसीआयने मीडिया हक्क विकत घेऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांना सांगितले आहे की, २०२३ ते २०२७ दरम्यान एकूण ४१० सामने खेळवले जाणार आहेत.

मात्र, बीसीसीआयने पुढील सीझन हे कोणत्या फॉरमॅटनुसार खेळवले जाईल हे स्पष्ट केलेले नाही. यामुळे संपूर्ण स्पर्धा ही ८४ सामन्यांमध्ये संपेल की स्पर्धेत ९४ सामने खेळवले जातील हे सांगणे कठीण आहे. कारण जर ९४ सामन्यांची स्पर्धा झाली तर सर्व संघ हे आपापसात दोन सामने खेळतील आणि त्यानंतर प्लेऑफमध्ये चार सामने होतील. परंतु ८४ सामने झाले तर ते त्याचे आयोजन कसे होईल हे सांगणे अद्याप कठीण आहे.

बीसीसीआचा फायदा-

सामन्यांची संख्या वाढल्यानंतर मीडिया प्रसारण हक्कांसाठी बोली लावणाऱ्या कंपन्या या मोठ्या किंमतीत बोली लावतील. अधिक सामन्यांमुळे सामना प्रसारित करणाऱ्या चॅनेलला जाहिरातीसाठीही अधिकचा वेळ मिळेल. त्यामुळे त्यांची कमाई वाढणार आहे. हे लक्षात घेऊन सर्व कंपन्या आयपीएलचे मीडिया हक्क विकत घेण्यासाठी लिलावत मोठी बोली लावण्याचा अंदाज आहे, याचा बीसीसीआयला मोठा फायदा होईल.

आयपीएलची लोकप्रियता कमी होण्याची भीती-

सामन्यांची संख्या वाढल्याने आयपीएलमधील प्रेक्षकांची उत्सुकता कमी होऊ शकते. आयपीएल २०२२ मध्ये ७४ सामने खेळले गेले. तसेच यावेळी प्रेक्षकांची संख्याही कमी झाली होती. लांबलचक स्पर्धा हे प्रेक्षकांच्या संख्येत घट होण्याचे प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. आगामी काळात सामन्यांची संख्या वाढल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी कमी होऊ शकते.

WhatsApp channel