मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK vs SRH Dream 11 Prediction : आज धोनी-पॅट कमिन्स भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा परफेक्ट टीम

CSK vs SRH Dream 11 Prediction : आज धोनी-पॅट कमिन्स भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा परफेक्ट टीम

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 28, 2024 04:09 PM IST

csk vs srh dream 11 prediction : आयपीएल २०२४ मध्ये आज सीएसके आणि हैदराबादचे संघ आमनेसामने येणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजेपासून खेळला जाईल.

CSK vs SRH Dream 11 Prediction : आज धोनी-पॅट कमिन्स भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा परफेक्ट टीम
CSK vs SRH Dream 11 Prediction : आज धोनी-पॅट कमिन्स भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा परफेक्ट टीम

आयपीएल २०२४ चा ४६ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. यंदाच्या मोसमात दोन्ही संघांची कामगिरी जवळपास सारखीच आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

मात्र, हैदराबादचा संघ चेन्नईपेक्षा थोडा पुढे आहे. यंदाच्या मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा भिडणार आहेत. 

सनरायझर्स हैदराबादने या स्पर्धेत आतापर्यंत ७ पैकी ५ सामने जिंकले असून गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहेत. यंदाच्या मोसमात सनरायझर्ससाठी त्यांच्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. 

चेन्नई सुपर किंग्स संघ या मोसमात आतापर्यंत ८ पैकी ४ सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे आणि सध्या गुणतालिकेत ५व्या स्थानावर आहे. 

दरम्यान, चेन्नई असो की हैदराबाद, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

CSK VS SRH Dream11 Prediction

विकेटकीपर: हेनरिक क्लासेन

फलंदाज: अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), शिवम दुबे, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा (कर्णधार)

अष्टपैलू: मोईन अली, रवींद्र जडेजा

गोलंदाज: मथिशा पाथिराना, मुस्तफिझूर रहमान, पॅट कमिन्स

सीएसके वि. हैदराबाद हेड टू हेड

चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी आयपीएलमध्ये एकमेकांविरुद्ध एकूण २० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये सीएसकेने १४ सामने जिंकले असून हैदराबाद संघाने ६ सामने जिंकले आहेत. याआधी दोन्ही संघ ५ एप्रिल २०२४ रोजी आमनेसामने आले होते. त्या सामन्यात १६६ धावांचा पाठलाग करताना हैदराबादने १८.१ षटकात सामना जिंकला होता.

पीच रिपोर्ट

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचा बोलबाला आहे. चेंडू थांबून बॅटवर येतो त्यामुळे फलंदाजांना खूप संघर्ष करावा लागतो. एम चिदंबरम स्टेडियममध्ये एकूण ११० सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानावर एकूण ७६ आयपीएल सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये यजमान संघाने ५१ सामने जिंकले आहेत, तर पाहुण्या संघाने २५ सामने जिंकले आहेत.

CSK चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चालू मोसमात ४ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये CSK ने पहिले ३ सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत सनरायझर्स हैदराबादसाठी ही स्पर्धा सोपी जाणार नाही.

IPL_Entry_Point