मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK vs SRH Highlights : चेन्नईच्या गोलंदाजांनी दाखवला दम, हैदराबादला हरवून सीएसके गुणतालिकेत टॉप ३ मध्ये

CSK vs SRH Highlights : चेन्नईच्या गोलंदाजांनी दाखवला दम, हैदराबादला हरवून सीएसके गुणतालिकेत टॉप ३ मध्ये

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 28, 2024 11:41 PM IST

CSK vs SRH Highlights : आयपीएल २०२४ मध्ये आज चेन्नई आणि हैदराबाद आमनेसामने होते. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला.

CSK vs SRH Highlights
CSK vs SRH Highlights (PTI)

CSK vs SRH Indian Premier League 2024 : आयपीएल २०२४ चा ४५ वा सामना चेन्नई सुपर किग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने हैदराबादचा ७८ धावांनी धुव्वा उडवला.

ट्रेंडिंग न्यूज

हैदराबादने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर सीएसेकने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ १८.५ षटकात १३४ धावाच करू शकला. 

या विजयासह चेन्नई संघाने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. या संघाने सहाव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चेन्नई संघाने आतापर्यंत ९ पैकी ५ सामने जिंकले आहेत.

दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्सला पराभवानंतर मोठा फटका बसला आहे. हा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. सनरायझर्स संघाने आतापर्यंत ९ पैकी ५े सामने जिंकले आहेत.

तत्पूर्वी, चेन्नईने दिलेल्या २१३ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला हैदराबादचा संघ १३४ धावा करून सर्वबाद झाला. 

त्यांच्यासाठी मार्करामने ३२ धावांची खेळी खेळली. क्लासेनने २० धावा केल्या. यादरम्यान चेन्नईकडून गोलंदाजी करताना तुषार देशपांडेने ४ बळी घेतले. पाथीराना आणि मुस्तफिझूरने २-२ विकेट घेतल्या. जडेजा आणि शार्दुलने १-१ विकेट घेतली.

सीएसकेचा डाव

प्रथम खेळताना चेन्नई सुपर किंग्जकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५४ चेंडूत ९८ धावांची शानदार खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. त्याच्याशिवाय डॅरिल मिशेलनेही अर्धशतकी खेळी खेळली. त्याने ३२ चेंडूत ५२ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारला.

शेवटच्या षटकांमध्ये, शिवम दुबेने २० चेंडूत ३९ धावा केल्या. हैदराबादकडून टी नटराजन, भुवनेश्वर कुमार आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन.

इम्पॅक्ट सब: उमरान मलिक, मयंक मार्कंडे, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर.

चेन्नई सुपर किंग्ज : अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथिशा पाथिराना.

इम्पॅक्ट सब: समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर.

IPL_Entry_Point