मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  WhatsApp New Features : व्हॉट्सअ‍ॅपवर आता स्वत:लाही पाठवा मेसेज; कंपनीकडून नव्या फीचरची घोषणा

WhatsApp New Features : व्हॉट्सअ‍ॅपवर आता स्वत:लाही पाठवा मेसेज; कंपनीकडून नव्या फीचरची घोषणा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 29, 2022 03:14 PM IST

WhatsApp New Features : व्हॉट्सअ‍ॅपनं आता एक नवं आणि मजेशीर फीचर जारी करण्याची घोषणा केली आहे. त्यामार्फत आता युजर्सला स्वत:लाही मेसेज पाठवता येणार आहे.

WhatsApp New Features In Marathi
WhatsApp New Features In Marathi (HT)

WhatsApp New Features In Marathi : भारतासह जगभरात कोट्यवधी युजर्स असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप कंपनीनं एक नवं आणि मजेशीर फीचर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. Message Yourself असं या नव्या फीचर्सचं नाव असून त्याद्वारे युजर्सला स्वत:लाही मेसेज पाठवता येणार आहे. याशिवाय नोट्स आणि रिमाईंडर्सही या फीचर्समुळं युजर्सला तयार करता येणार आहे. येत्या काही महिन्यांत व्हॉट्सअ‍ॅपकडून हे अनोखं फीचर जारी करण्यात येणार असल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅप कंपनीनं दिली आहे.

अनेक लोकांना नोट्स किंवा महत्त्वाच्या नोंदी वही किंवा रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवायची सवय असते. याशिवाय काही लोक किराणा मालाची यादी अथवा शॉपिंगसाठी आवश्यक सामानांची यादीही सोबत घेऊन जात असतात, अशा लोकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपचं Message Yourself हे फीचर अत्यंत उपयोगी असणार आहे. हे फीचर अ‍ॅंड्राईड आणि अ‍ॅपलच्या स्मार्टफोन्सवरही देण्यात येणार आहे. याशिवाय आता येत्या काही दिवसांत व्हॉट्सअ‍ॅपवर तब्बल एकाचवेळी अनेक लोकांना व्हिडिओ कॉलवर एकत्र येता येणार असल्याचं Communities On Whatsapp हे फीचर जारी करण्यात येणार असल्याचं मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं आहे.

त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅप येत्या काही दिवसांत व्हाईस नोट्सचा पर्याय असलेलं एक फीचरही लॉन्च करण्याची शक्यता आहे. या फीचर्समार्फत नोट्स तयार करता येईलच परंतु ३० सेकंदांचे व्हाईस नोट्स व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसलाही अपलोड करता येणार आहे. याशिवाय Communities On Whatsapp या फीचरचा वापर करताना लोकांच्या मेसेजेसही सुरक्षा कायम राहणार असल्याचं आश्वासन व्हॉट्सअ‍ॅपनं दिलं आहे.

IPL_Entry_Point