मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Dhruv Rathee: दाऊद इब्राहिमच्या बंगल्यात राहतो ध्रुव राठी आणि त्याची पाकिस्तानी पत्नी? यूट्यूबरने केला खुलासा

Dhruv Rathee: दाऊद इब्राहिमच्या बंगल्यात राहतो ध्रुव राठी आणि त्याची पाकिस्तानी पत्नी? यूट्यूबरने केला खुलासा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 01, 2024 04:51 PM IST

Dhruv Rathee News : ध्रुव राठीचे खरे नाव बदरुद्दीन राशिद आहे. त्याचा जन्म पाकिस्तानमधील लाहौर शहरात झाला आहे. तर त्याची पत्नीही पाकिस्तानी नागरिक असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यावर ध्रुव राठीने स्पष्टीकरण दिले आहे.

दाऊद इब्राहिमच्या बंगल्यात राहतो ध्रुव राठी आणि त्याची पाकिस्तानी पत्नी?
दाऊद इब्राहिमच्या बंगल्यात राहतो ध्रुव राठी आणि त्याची पाकिस्तानी पत्नी?

यूट्यूबर ध्रुव राठी (Dhruvrathee)आणि त्याची पत्नी पाकिस्तानी आहेत तसेच ते कराची शहरात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (DawoodIbrahim) बंगल्यात राहतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अशा प्रकारच्या वृत्ताला ध्रुव राठीने (youtuberDhruvrathee)अफवा म्हटले आहे. त्याने म्हटले आहे की, माझ्याकडून बनवण्यात आलेल्या व्हिडिओचे त्यांच्याकडे काहीच उत्तर नसल्याने असे खोटे दावे केले जात आहेत. राठी नेहमी आपल्या यूट्यूब चॅनलवरून मोदी सरकारवर टीका करतो. नुकतेच त्याने मोदी सरकारला हुकूमशाही सरकार म्हटले होते तसेच इलेक्टोरल बॉन्ड भारतीय इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा म्हटले होते.

ट्रेंडिंग न्यूज

ध्रुव राठीने दावा केला आहे की, तो पाकिस्तानी नसून १०० टक्के भारतीय आहे तसेच त्याची पत्नी जर्मन आहे. त्याने म्हटले की, सोशल मीडियावर त्याच्या व कुटूंबाविरोधात अपप्रचार केला जात आहे. ध्रुव राठी याने आपल्या पत्नीविषयी सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांचे खंडन केले आहे. व्हायरल पोस्टमध्ये दावा केला जात आहे की, ध्रुव राठीचे खरे नाव बदरुद्दीन राशिद आहे. त्याचा जन्म पाकिस्तानमधील लाहौर शहरात झाला आहे. तर त्याची पत्नीही पाकिस्तानी नागरिक असून तिचे नाव जुलेखा आहे. त्याचबरोबर असाही दावा केला जात आहे की, हे कपल कराचीमध्ये दाऊद इब्राहिमच्या घरात राहतात.

ध्रुव राठी नियमितपणे आपल्या यूट्य़ूब चॅनलच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व सत्ताधारी भाजप सरकारवर टीकात्मक व्हिडिओ पोस्ट करत असतात. नुकतेच सोशल मीडियावर त्याच्या व त्याच्या पत्नीबाबत नवीन दावे करण्यात आले आहेत. त्यावर राठीने स्पष्टीकरण दिले आहे.

राठीने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टच्या उत्तरात म्हटले की, मी बनवलेल्या व्हिडिओचे त्यांच्याकडे कोणतेच उत्तर नसल्याने ते अशा खोट्या अफवा पसरवत आहेत.माझ्या पत्नीच्या कुटूंबालाही यामध्ये ओढले जात असून इतके हताश तुम्ही आहात?लोकआईटी सेल कर्मचाऱ्यांचे घृणास्पद काम पाहू शकतात.

 

राठी यांनी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये दावा केला होता की,भारत हुकूमशाहीकडे झुकत आहे?लडाख मरत आहे. इलेक्टोरल बॉन्ड भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे. त्यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर लाखों यूजर पाहत असतात. सोशल मीडियावर राठीचे १८०मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

IPL_Entry_Point