मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sunny Deol: सनी देओल आणि डिंपल कपाडियाचे अफेअर ४० वर्षांनंतरही सुरु? लंडनमधील फोटो झाला होता व्हायरल

Sunny Deol: सनी देओल आणि डिंपल कपाडियाचे अफेअर ४० वर्षांनंतरही सुरु? लंडनमधील फोटो झाला होता व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 19, 2022 11:12 AM IST

Sunny Deol Dimple Kapadia Affair: अभिनेत्री अमृता सिंहने सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या अफेअरविषयी मोठा खुलासा केला होता.

सनी देओल
सनी देओल (HT)

एकेकाळी बॉलिवूडमध्ये अशा अभिनेत्याची एण्ट्री झाली होती की जो वडिलांप्रमाणे एकदम फिट, हँडसम पर्सनालिटी त्यासोबतच दमदार आवजाने प्रेक्षकांची मने जिंकत होता. हा अभिनेता म्हणजे मेगास्टार धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांचा मोठा मुलगा सनी देओल. आज १९ ऑक्टोबर रोजी सनी देओलचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी खास गोष्टी...

सनी देओलने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९८३ साली प्रदर्शित झालेल्या 'बेताब' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर सनीने अनेक हिट चित्रपट दिले. पण आज सनीला चित्रपट मिळणे कठीण झाले आहे. काळ पुढे सरकत जातो तशा अनेक गोष्टी बदलतात. पण सनीच्या आयुष्यात एक गोष्ट अजूनही कायम आहे. ती म्हणजे सनीच्या लव्हलाइफ बद्दलच्या अफवा.
वाचा: डॉलर वाचवण्यासाठी बांगलादेश सरकारनं रद्द केला नोरा फतेहीचा डान्स

सनी देओलचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते. पण अमृता सिंह आणि डिंपल कपाडिया यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चा जास्त गाजल्या होत्या. सनी आणि डिंपलच्या नात्यावर अमृताने शिक्का मोर्तब केला होता. त्यावेळी सनी विवाहित होता. तरी देखील अमृताला तो डेट करत होता.

अर्जुन', 'मंजिल-मंजिल', 'आग का गोला', 'गुनाह' आणि 'नरसिम्हा' या चित्रपटात सनी आणि डिंपलने एकत्र काम केले होते. पण त्यांच्या अफेअरच्या चर्चा जेव्हा सुरु झाल्या तेव्हा दोघेही विवाहित होते. अनेकदा ते दोघे एकत्र फिरताना दिसले होते. जेव्हा डिंपलची बहिण सिंपलचे निधन झाले तेव्हा सनी तेथे पोहोचला होता. त्याने डिंपलचे सांत्वन केले होते. ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना सनी छोटे बाबा म्हणून आवज देत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सनीला डिंपलशी लग्न करायचे होते. पण सनीची पत्नी पूजाने त्याला धमकी दिली होती, जर असे काही झाले तर मुलांना घेऊन लांब निघून जाईन. कुटुंब वाचवण्यासाठी सनीने लांब राहण्याचे ठरवले.

डिंपल आणि सनीने कुटुंबीयांसाठी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र २०१७ साली मोनाकोमध्ये ते दोघे एकत्र असल्याचे दिसले होते. त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये दोघे हातात हात धरुन बसल्याचे दिसत होते.

IPL_Entry_Point

विभाग