मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अन् भरत जाधवने तब्बल दीड तास थांबवला नाटकाचा प्रयोग; चाहत्याने ट्विट केलं आणि…

अन् भरत जाधवने तब्बल दीड तास थांबवला नाटकाचा प्रयोग; चाहत्याने ट्विट केलं आणि…

Payal Shekhar Naik HT Marathi
Jun 12, 2022 12:36 PM IST

एका कारणामुळे भरतने तब्बल दिड तास त्याच्या नाटकाचा प्रयोग थांबवला होता. एका चाहत्याने ट्विट करत हा प्रकार समोर आणला.

भरत जाधव
भरत जाधव

लोकप्रिय अभिनेता भरत जाधव( bharat jadhav)मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. प्रेक्षकांच्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या भरतने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. परंतु, नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे तो चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. एका कारणामुळे भरतने तब्बल दिड तास त्याच्या नाटकाचा प्रयोग थांबवला होता. एका चाहत्याने ट्विट करत हा प्रकार समोर आणला. मात्र यामुळे नाट्य कलाकार आणि नाट्य प्रेमींना कशाप्रकारे गृहीत धरलं जातंय, हे पुन्हा एकदा समोर आलं.

ट्रेंडिंग न्यूज

भरतने त्याच्या इंस्टास्टोरीवर एक स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं, 'नाट्यगृह व्यवस्थापन हा एक पीएचडी चा स्वतंत्र विषय होऊ शकतो.' भरतच्या या पोस्टमागचं कारण म्हणजे त्याच्या 'सही रे सही' प्रयोगादरम्यानचं ढिसाळ नाट्यगृह व्यवस्थापन. भरतने त्याच्या स्टोरीवर एका चाहत्याने केलेलं ट्विट शेअर केले होतं. त्या ट्विटमध्ये चाहत्याने घडलेला संपूर्ण प्रसंग लिहिला होता. चाहत्याने लिहिलं, 'स्वानुभव भरत जाधव यांच्या 'सही रे सही'च्या प्रयोगाला गेलो असताना, हॉलमधले काही पंखे बंद होते. त्यात एसी पूर्णपणे ठप्प होता. आम्ही प्रेक्षक बोंब मारायला लागलो. त्यावेळी नाटक मध्येच थांबवून भरत जाधवांनी महापौरांना फोन करुन जोपर्यंत पंखे नीट करणार नाही, तोपर्यंत प्रयोग असाच थांबून राहील असं सांगितलं. अक्षरशः नाटक दीड तास थांबलं होतं. त्या दीड तासात भरत जाधव आमच्यासोबत बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही प्रेक्षक अंधारात बसला आहात. इथे आमच्या स्टेजवर चेहऱ्यावर हजार-हजार वॅटचे लाईट आहेत. आम्ही सुद्धा घामाने बेजार झालो आहोत. तेव्हा स्टेजवर असणाऱ्यांची खरी दुरावस्था कळाली.'

 

<p>tweet</p>
tweet

चाहत्याच्या या पोस्टवरून फक्त प्रेक्षकच नाही तर कलाकारांनाही नाट्यगृहांमध्ये किती अडचणींचा सामना करावा लागतो हे स्पष्ट होतं. अनेक कलाकार या विषयी आवाज उठवताना देखील दिसतात. मात्र नाट्यगृह व्यवस्थापन या गोष्टींकडे सरसकट दुर्लक्ष करताना दिसतंय. अनेकदा आवाज उठवूनही त्यांच्या प्रश्नांकडे कुणीही लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे भरत यांच्या पोस्टनंतर नेटकरी यावर रोष व्यक्त करताना दिसतायत.

IPL_Entry_Point