मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  'तिकडे वडिलांना अग्नी देत होते आणि मी हास्यजत्रेच्या खूर्चीत', प्रसाद ओकने सांगितला धक्कादायक अनुभव

'तिकडे वडिलांना अग्नी देत होते आणि मी हास्यजत्रेच्या खूर्चीत', प्रसाद ओकने सांगितला धक्कादायक अनुभव

May 02, 2024 11:02 AM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकने एका मुलाखतीमध्ये भन्नाट किस्सा सांगितला आहे. 'तिकडे वडिलांना अग्नी देत होते आणि मी हास्यजत्रेच्या खूर्चीत' असे तिने म्हटले आहे.

मराठी चित्रपटसृ्ष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक म्हणून अभिनेता प्रसाद ओक ओळखला जातो. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. सध्या तो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मालिकेत तो सध्या परीक्षक म्हणून दिसत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

प्रसादने नुकताच ‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने आयुष्यातील कठीण काळाविषयी सांगितले आहे. दमणला तो हास्यजत्रा कार्यक्रमाचे शुटिंग करत होता. करोना काळ असल्यामुळे तिकडे चित्रीकरण सुरु होते. पण त्याच काळात त्याच्या वडिलांचे निधन झाले. प्रसादला वडिलांचे शेवटचे दर्शन देखील झाले नाही.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

“दमणमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये हास्यजत्रेचा सेट बांधला होता. तिथेच आम्ही चित्रीकरण करत होतो. २९ एप्रिलला आम्ही दमणमध्ये पोहोचलो. आम्ही सगळे सेटल झालो आणि ३० एप्रिलला तिथल्या शेड्यूलप्रमाणे पहिला एपिसोडचे सकाळी ९ वाजता चित्रीकरण सुरू करणार होतो. आम्ही सकाळी ६ ते ७ वाजता उठलो. आवरायला घेतले. उठून जरा फ्रेश झाल्यानंतर बघितले तर बायकोचे ८ ते १० मिस्डकॉल आले होते. मी झोपलो होतो म्हणून मी उठल्यानंतर पाहिला फोन पाहिला. तिने मला सांगितलं की, माझे वडील गेले” असे प्रसाद म्हणाला.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

पुढे तो म्हणाला की, "वडिलांना १५ मिनिटे देखील ठेवण्याची परवानगी नव्हती. कारण परिस्थिती भयंकर होती. मी विनंती केल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्हाला यायला ६ ते ७ तास लागणार. आम्ही १५ मिनिटे देखील थांबू शकत नाही." 
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

नंतर प्रसादने व्हिडीओ कॉल लावून देण्याची विनंती केली. पण तेथे फोनला परवानगी नसल्यामुळे त्याच्या भावालाही फोन बाहेर ठेवावा लागला होता. "भाऊ इकडे वडिलांना अग्नी देत होता आणि तिकडे मी हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून स्किट बघत होतो," असे प्रसाद म्हणाला.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

नंतर प्रसादने व्हिडीओ कॉल लावून देण्याची विनंती केली. पण तेथे फोनला परवानगी नसल्यामुळे त्याच्या भावालाही फोन बाहेर ठेवावा लागला होता. "भाऊ इकडे वडिलांना अग्नी देत होता आणि तिकडे मी हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून स्किट बघत होतो," असे प्रसाद म्हणाला.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज