मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बरं झालं, राहुल गांधींनी हिमंत सरमापेक्षा कुत्र्याला महत्त्व दिलं - अलका लांबा

बरं झालं, राहुल गांधींनी हिमंत सरमापेक्षा कुत्र्याला महत्त्व दिलं - अलका लांबा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Nov 23, 2022 01:36 PM IST

Rahul Gandhi: आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी गुजरातमध्ये एका सभेत बोलताना राहुल गांधींची तुलना सद्दाम हुसैनशी केली होती.

बरं झालं राहुल गांधींनी हिमंत सरमापेक्षा कुत्र्याला महत्त्व दिलं - अलका लांबा
बरं झालं राहुल गांधींनी हिमंत सरमापेक्षा कुत्र्याला महत्त्व दिलं - अलका लांबा

Rahul Gandhi: भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दाढी वाढली आहे. त्यावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी टीका केली होती. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी गुजरातमध्ये एका सभेत बोलताना राहुल गांधींची तुलना सद्दाम हुसैनशी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, बरं झालं राहुल गांधींनी हिमंत बिस्व सरमा यांच्यापेक्षा आपल्या कुत्र्याला जास्त महत्त्व दिलं.

हिमंत बिस्व सरमा हे सातत्यानं आरोप करतात की जेव्हा ते किंवा इतर कोणीही काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेण्यासाठी दिल्लीला जायचे तेव्हा नेत्यांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी आपल्या कुत्र्याकडे लक्ष देतात. काँग्रेसमधन बाहेर पडल्यानंतर हिमंत सरमा यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली होती. राहुल गांधी नेत्यांचं ऐकून घेत नाहीत असा आरोप केला होता.

गुजरातमध्ये निवडणूक प्रचारावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी राहुल गांधींवर टीका केली. भारत जोडो यात्रेवेळी आपल्या उद्देशापासून दूर गेलेल्या राहुल गांधींची प्रतिमा वेगळीच झालीय. राहुल गांधी हे आजकाल इराचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेनसारखे दिसत आहेत. गांधी वंशाचा चेहरा हा महात्मा गांधी किंवा सरदार पटेल यांच्यासारखा असावा, तो सद्दाम हुसेनसारखा नसावा असं हिमंत सरमा म्हणाले होते.

IPL_Entry_Point