मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut Bail : संजय राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा.. जामिनाच्या स्थगितीची ईडीची मागणी फेटाळली

Sanjay Raut Bail : संजय राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा.. जामिनाच्या स्थगितीची ईडीची मागणी फेटाळली

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 09, 2022 03:34 PM IST

Sanjay Raut Bail Granted: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीनास स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी ईडीची याचिका विशेष न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आजच संजय राऊत यांची सुटका होणार आहे.

संजय राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा
संजय राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

 

Sanjay Raut Bail : पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते व राज्यसभा खासदार यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. संजय राऊत (Sanjay raut bail) यांच्या जामीनाला स्थगिती मिळावी, अशी याचिता ईडीकडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे संजय राऊत यांची आजच सुटका होणार आहे. अनेक वेळी जामीन नामंजूर झाल्यानंतर आज अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. 

संजय राऊत यांच्या जामीनाला विरोध करत ईडीने जामीनाला स्थगिती देण्यात यावी, अशी एक याचिका विशेष न्यायालयात दाखल केली होती. यावर दुपारी ३ वाजता सुनावणी करत विशेष सत्र न्यायालयाने ही स्थगिती द्यायला नकार दिला आणि संजय राऊतांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला. 

दोन लाख रोख बाँडवर संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची सुटका करण्यात आली आहे. संजय राऊत हे मागील जवळपास तीन महिन्याहून अधिक दिवसांपासून तुरुंगात आहेत. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. 

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आता ईडी मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहे. 

IPL_Entry_Point