मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Winter Skin Care: आंघोळीपूर्वी चेहऱ्यावर लावा 'या' गोष्टी, त्वचा चमकेल!

Winter Skin Care: आंघोळीपूर्वी चेहऱ्यावर लावा 'या' गोष्टी, त्वचा चमकेल!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Nov 18, 2022 12:23 PM IST

Pre-Bath Routine For Glowing Skin: अशा काही गोष्टी आहेत ज्या अंघोळ करण्यापूर्वी त्वचेवर वापरल्या तर फायदेशीर ठरू शकतात.

स्किन केअर
स्किन केअर (Freepik )

आरोग्याप्रमाणेच आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घेयची असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी रोज अंघोळ करणे आवश्यक आहे. अंघोळ करताना तर आपण अनेक उत्पादने वापरून त्वचा छान बनवण्यासाठी प्रयत्न करतो. असेच सकाळी आंघोळ करण्यापूर्वी काही गोष्टी चेहर्‍यावर लावल्या तर त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते. याशिवाय डागहीन त्वचाही मिळू शकते. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही अंघोळ करण्यापूर्वी त्वचेवर लावू शकता आणि निखळ त्वचा मिळवू शकता. जाणून घ्या या गोष्टींबद्दल...

'या' गोष्टी लावा चेहऱ्यावर

१) अंघोळ करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेवर कोरफडीचे जेल लावू शकता. कोरफड जेल केवळ त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास मदत करते असं नाही तर ते त्वचेला चमक देखील देऊ शकते. याच्या वापराने मुरुमांच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो.

२) आंघोळ करण्यापूर्वी तुम्ही त्वचेवर हळद आणि बेसन देखील वापरू शकता. हळद आणि बेसन केवळ त्वचेचा रंग वाढवण्यासाठीच उपयुक्त नाही, तर त्वचेवर साचलेली सर्व घाण काढून टाकण्यासाठीही ते खूप उपयुक्त ठरू शकते.

३) आंघोळ करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेवर मुलतानी माती वापरू शकता. मुलतानी माती केवळ मुरुमांच्या समस्येपासून आराम देऊ शकत नाही तर त्वचेवरील लालसरपणा किंवा जळजळ दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

४) आंघोळ करण्यापूर्वी तुम्ही त्वचेवर चंदनाची पेस्ट लावू शकता. चंदनाच्या पेस्टमुळे त्वचेला थंडावा तर मिळतोच पण त्याच्या वापराने डागही दूर होतात.

५) आंघोळ करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेवर कडुलिंब आणि बेसन पेस्ट देखील लावू शकता. या लेपमुळे त्वचेच्या समस्या तर दूर होतातच शिवाय तुमची त्वचा सुंदर बनते.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग