मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Happy Birthday Yami Gautam: अभिनयात नाही तर ‘या’ क्षेत्रात यामी गौतमला करायचं होतं करिअर

Happy Birthday Yami Gautam: अभिनयात नाही तर ‘या’ क्षेत्रात यामी गौतमला करायचं होतं करिअर

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 28, 2022 08:07 AM IST

Yami Gautam: यामीला कधीच अभिनेत्री बनायचं नव्हतं. तिला एका वेगळ्याच क्षेत्रात आपलं करिअर घडवायचं होतं.

Yami gautam
Yami gautam

Yami Gautam: बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मालिका विश्वातून सुरु झालेला त्यांचा प्रवास त्यांना बॉलिवूडच्या दिशेने घेऊन गेला. अशा अभिनेत्रींपैकी एक म्हणजे यामी गौतम. अल्पावधीतच तिने या क्षेत्रात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं. मात्र, यामीला कधीच अभिनेत्री बनायचं नव्हतं. तिला एका वेगळ्याच क्षेत्रात आपलं करिअर घडवायचं होतं. पण, अचानक तिचं मनं बदललं आणि तिची पावलं अभिनय विश्वाकडे वळली.

ट्रेंडिंग न्यूज

यामीचा जन्म २८ नोव्हेंबर १९८८मध्ये हिमाचलमधील बिलासपूरमध्ये झाला. यामीचे वडील मुकेश गौतम हे पंजाबी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. तर, यामीची बहिण सुरीली देखील एक अभिनेत्री आहे. यामुळे अभिनयाचं वातावरण घरात सुरुवातीपासूनच होती. पण, अभ्यासात हुशार असलेल्या यामीला नेहमीच एक आयएएस ऑफिसर बनायचं होतं. यासाठी तिने तयारी देखील सुरु केली होती. मात्र, अचानक तिचं मनं बदललं आणि तिने अभिनय विश्वात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. यासाठी ती मुंबईतही आली.

यामी गौतमने अभिनय कारकिर्दीची सुरुवात मालिका विश्वातून केली होती. ‘चाँद के पार चलो’ या मालिकेतून तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. यानंतर ती अनेक मालिकांमध्ये झळकली. ‘ये प्यार ना होगा कम’ या मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली. यानंतर तिने काही जाहिरातींमध्येही काम केले. ‘फेअर अँड लवली’च्या जाहिरातीचा ती प्रसिद्ध चेहरा बनली. यासाठी तिला अनेकदा टीका देखील सहन करावी लागली होती.

मालिकाविश्व गाजवल्यानंतर यामीने चित्रपटांकडे वळण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान तिने एका साऊथ चित्रपटातही काम केलं. २०१२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विकी डोनर’मधून तिने बॉलिवूड विश्वात पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातून यामीने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. या चित्रपटात यामीसोबत अभिनेता आयुष्मान खुराना झळकला होता. ‘विकी डोनर’नंतर यामीकडे अनेक मोठ्या चित्रपटांची रांग लागली. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’, ‘काबील’, ‘बदलापूर’, ‘दसवी’ अशा दमदार चित्रपटांमध्ये यामी गौतम झळकली.

IPL_Entry_Point

विभाग