मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH Vs LSG : १६६ धावांचं लक्ष्य हैदराबादनं ९ षटकात गाठलं, ट्रेव्हिस हेड-अभिषेक शर्माने लखनौला धु-धु धुतलं

SRH Vs LSG : १६६ धावांचं लक्ष्य हैदराबादनं ९ षटकात गाठलं, ट्रेव्हिस हेड-अभिषेक शर्माने लखनौला धु-धु धुतलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 08, 2024 07:43 PM IST

SRH Vs LSG IPL Score : आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने होते. या सामन्यात हैदराबादने लखनौचा १० विकेट्सनी धुव्वा उडवला.

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants
Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants (AP)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ५७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने होते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हैदराबादने ६० चेंडू शिल्लक ठेवून १० विकेट्सने सामना जिंकला. 

ट्रेंडिंग न्यूज

लखनौने फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून १६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादने एकही विकेट न गमावता अवघ्या ९.४ षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. 

हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड ३० चेंडूत ८९ धावा करून नाबाद परतला. त्याच्या बॅटमधून ८ चौकार आणि ८ षटकार आले. तर अभिषेक शर्मा २८ चेंडूत ७५ धावा करून नाबाद परतला. त्याने ८ चौकार आणि ६ षटकार मारले. लखनौविरुद्ध हैदराबादचा हा पहिला विजय आहे.

हैदराबाद वि. लखनौ क्रिकेट स्कोअर

हैदराबादच्या ६ षटकात १०७ धावा

हैदराबादची धावसंख्या अवघ्या ६ षटकांत  बिनबाद १०७ धावांवर पोहोचली आहे. ट्रॅव्हिस हेड १८ चेंडूत ५८ धावांवर खेळत आहे. त्याने आतापर्यंत ७ चौकार आणि ५ षटकार मारले आहेत. तर अभिषेक शर्मा १८ चेंडूत ४६ धावांवर खेळत आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत ६ चौकार आणि ३ षटकार आले आहेत.

ट्रॅव्हिस हेडचं १६ चेंडूत अर्धशतक

१६६ धावांचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा तुफानी फलंदाजी करत आहेत. हेडने अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावले. तो १८ चेंडूत ५८ धावांवर आहे. तर अभिषेक शर्मा १२ चेंडूत २६ धावांवर खेळत आहे. हैदराबादची धावसंख्या अवघ्या ५ षटकांत ८७ धावा झाली आहे.

लखनौच्या १६५ धावा

लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादसमोर १६६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनौने २० षटकांत ४ गडी गमावून १६५ धावा केल्या. एकवेळ लखनौने १२व्या षटकात ६६ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. यानंतर आयुष बडोनी आणि निकोलस पुरन यांनी ५२ चेंडूत ९९ धावांची नाबाद भागीदारी केली.

बडोनीने ३० चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ५५ धावा केल्या. त्याचवेळी पुरणने २६ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४८ धावांची नाबाद खेळी केली.

केएल राहुल ३३ चेंडूत २९ धावा करून बाद झाला, क्विंटन डी कॉक दोन धावा करून बाद झाला आणि मार्कस स्टॉइनिस ३ धावा करून बाद झाला. तर कृणाल पांड्याने २१ चेंडूत २४ धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने २ बळी घेतले. त्याचवेळी कर्णधार पॅट कमिन्सला एक विकेट मिळाली.

लखनौला चौथा धक्का

लखनौला ६६ च्या स्कोअरवर चौथा धक्का बसला. १२व्या षटकात क्रुणालने मिडऑफवर शॉट खेळला आणि धाव घेण्यासाठी धाव घेतली, पण तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या कमिन्सने नॉन-स्ट्रायकर एंडला अप्रतिम थ्रो केला. चेंडू सरळ जाऊन विकेटवर आदळला. क्रुणाल क्रीजपासून दूर होता. अशा स्थितीत तो धावबाद झाला. कृणालने २१ चेंडूत २ षटकारांच्या मदतीने २४ धावांची खेळी केली. सध्या निकोलस पुरन आणि आयुष बडोनी क्रीजवर आहेत. १२ षटकांनंतर लखनौची धावसंख्या ४ विकेट गमावून ६९ धावा आहे.

केएल राहुल बाद

लखनौला १०व्या षटकात तिसरा धक्का बसला. भुवनेश्वर कुमारने केएल राहुलला टी नटराजनकरवी झेलबाद केले. त्याला ३३ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २९ धावा करता आल्या. १० षटकांनंतर सनरायझर्सची धावसंख्या ३ गड्यांच्या मोबदल्यात ५७ धावा आहे. सध्या निकोलस पुरन आणि कृणाल पंड्या क्रीजवर आहेत.

लखनौला दुसरा धक्का

लखनौला पाचव्या षटकात २१ धावांवर दुसरा धक्का बसला. भुवनेश्वर कुमारने मार्कस स्टॉइनिसला सनवीर सिंगकरवी झेलबाद केले. सनवीरने उत्कृष्ट कमी झेल घेतला. स्टॉइनिसला ३ धावा करता आल्या. सध्या कर्णधार केएल राहुल आणि कृणाल पंड्या क्रीजवर आहेत. ५ षटकांनंतर लखनौची धावसंख्या दोन बाद २३ धावा आहे.

लखनौ सुपर जायंट्सला पहिला धक्का

लखनौ सुपर जायंट्सला तिसऱ्या षटकात १३ धावांवर पहिला धक्का बसला. भुवनेश्वर कुमारने क्विंटन डी कॉकला नितीश रेड्डीकरवी झेलबाद केले. नितीशने सीमारेषेवर उत्कृष्ट झेल घेतला. सध्या मार्कस स्टॉइनिस आणि कर्णधार केएल राहुल क्रीजवर आहेत.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन. 

इम्पॅक्ट सब: ग्लेन फिलिप्स, उमरान मलिक, अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर.

लखनौ सुपर जायंट्स: क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, दीपक हुडा, कृणाल पंड्या, कृष्णप्पा गौतम, यश ठाकूर, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक. 

इम्पॅक्ट सब: मणिमरन सिद्धार्थ, युधवीर सिंग, देवदत्त पडिक्कल, ॲश्टन टर्नर, अमित मिश्रा.

लखनौनै टॉस जिंकला

लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार केएल राहुलने संघात काही बदल केले आहेत. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सचा आज वाढदिवस आहे. हैदराबादने संघात दोन बदल केले आहेत. मयंक अग्रवाल आणि मार्को यान्सेनच्या जागी सनवीर सिंगच्या जागी व्यास कांतला संघात स्थान देण्यात आले आहे. व्यासकांतचे हे आयपीएल पदार्पण आहे.

IPL_Entry_Point