या ५ ऑसी खेळाडूंना गुंडाळा, WTC जिंका

pat cummins ig

By Rohit Bibhishan Jetnavare
Jun 01, 2023

Hindustan Times
Marathi

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.

WTC Final जिंकून भारतीय संघ पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशीप जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

मात्र, इंग्लिश कंडिशन्समध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणे टीम इंडियासाठी सोपे असणार नाही.

ऑस्ट्रेलियन संघात एकाहून एक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. या खेळाडूंकडे एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे.

टीम इंडियाला अंतिम सामना जिंकायचा असेल, तर विशेषत: पुढील ५ खेळाडूंचा तोडगा काढावा लागेल.

स्टीव्ह स्मिथ सर्वात मोठा धोका आहे. स्मिथने भारताविरुद्धच्या १८ कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत १८८७ धावा केल्या आहेत.

उस्मान ख्वाजाने यावर्षी झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत अप्रतिम फलंदाजी केली होती. त्या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

मिचेल स्टार्कने आतापर्यंत भारताविरुद्ध १७ कसोटी सामन्यात ४४ बळी घेतले आहेत.

कर्णधार पॅट कमिन्सने भारताविरुद्धच्या १२ कसोटी सामन्यांमध्ये ४६ बळी घेतले आहेत. तो फलंदाजीही करतो.

ऑफस्पिनर नॅथन लायनने भारताविरुद्ध २६ कसोटीत आतापर्यंत ११६ विकेट्स घेतल्या आहेत. 

जास्त टरबूज खाण्याचे दुष्परिणाम

Pexels