जास्त टरबूज खाण्याचे दुष्परिणाम

Pexels

By Hiral Shriram Gawande
Apr 26, 2024

Hindustan Times
Marathi

उन्हाळ्यात टरबूज खायला सर्वांनाच आवडते. पण जास्त प्रमाणात टरबूज खाल्ल्याने काय होते हे तुम्हाला माहिती आहे का?

Pexels

टरबूज शरीर आणि मनाला समाधान देतो. हे समाधान मिळवण्यासाठी थोडे जास्तीचे टरबूज खाण्याकडे अनेकांचा कल असतो. जर तुम्ही जास्त टरबूज खाल्ले तर कोणते दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे ते पहा

Pexels

टरबूजमध्ये ९२ टक्के पाण्याचे प्रमाण असते. हे व्हिटॅमिन बी ६, सी, ए सह पोटॅशियमची खाण आहे. टरबूज रोग टाळण्यासाठी आणि शरीराचे वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. पण त्याचे तोटे देखील लक्षात घेण्यासारखे आहेत.

Pexels

जास्त टरबूज खाल्ल्याने डायरियासह विविध आजार होऊ शकतात. तसेच टरबूजमधील काही पदार्थांमुळे गॅस आणि अपचनाचा त्रास होतो.

Pexels

टरबूजमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. परिणामी जास्त टरबूज खाल्ल्याने समस्या वाढू शकते. टरबूजातील अँटीऑक्सिडंट शरीरात जास्त असल्यास पोटाचे विकार होऊ शकतात.

Pexels

टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे जास्त टरबूज खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी वाढते. जास्त पाणी असल्यास 'ओव्हरहायड्रेशन'ची समस्या निर्माण होते.

Pexels

किडनीच्या समस्या असलेल्यांनी टरबूज सावधगिरीने खावे.

Pexels

पोषणतज्ञ म्हणतात की प्रत्येक १०० ग्रॅम टरबूजमध्ये ६ ग्रॅम कॅलरी असतात. परिणामी ५०० ग्रॅम पर्यंत टरबूज शरीरासाठी पुरेसे आहे.

Pexels