घरात झोपाळा ठेवणे शुभ की अशुभ? जाणून घ्या...

By Harshada Bhirvandekar
Apr 24, 2024

Hindustan Times
Marathi

वास्तुशास्त्रामध्ये घरात ठेवलेला छोट्या मोठ्या वस्तूंचेही महत्त्व सांगितले आहे. 

असे मानले जाते की, घरात ठेवलेल्या वस्तूंच्या ऊर्जेचा त्या घरातील सदस्यांवर प्रभाव पडतो. चला तर घरातील झोपाळ्याबद्दल जाणून घेऊया... 

अनेक जण आपल्या घरात झोपाळा ठेवतात. मात्र, घरात झोपाळा बांधताना किंवा तयार झोपाळा ठेवताना काही नियम पाळणे गरजेचे आहे. 

वास्तुशास्त्रामध्ये, घरात झोपाळा असणे शुभ मानले जाते. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 

वास्तुशास्त्रात असे मानले जाते की, घरात झोपाळा असल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव आणि वाईट नजर दूर होते.

वास्तू नुसार, घरात लाकडापासून बनवलेला झोपाळा असावा. यामुळे घरात पैसा राहतो आणि आर्थिक स्थिती सुधारते.

लाकडापासून बनवलेला झोपाळा घरात लावल्याने आशीर्वाद मिळतात आणि त्याचा शुभ प्रभाव घरातील मुलांवरही दिसून येतो.

वास्तुशास्त्रानुसार, झोपाळा नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे झुलता असावा. यामुळे घरात बरकत येते.

उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून झोके घेतल्यास नशीब तुमची साथ देते. यामुळे नशीब उजळते आणि कामात यश मिळते.

नारळ पाण्याचे त्वचेसाठी काय आहेत फायदे?

Pexels