घरच्या घरी बनवा टेस्टी केळीचे चिप्स
By
Hiral Shriram Gawande
May 06, 2024
Hindustan Times
Marathi
चहासोबत क्रिस्पी चिप्सचा आस्वाद घेण्याचा आनंद वेगळाच असतो. प्रमाणात केळीचे चिप्स खाणे आरोग्यासाठीही चांगले असतात.
बहुतांश लोकांना केळीचे चिप्स खायला आवडतात. बहुतेक लोक ते बाजारातून विकत घेतात.
पण तुम्ही घरच्या घरी कुरकुरीत केळीचे चिप्स बनवू शकता.
केळीपासून क्रिस्पी चिप्स बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया.
हे बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे - ३ केळी, १ टीस्पून काळी मिरी पावडर, १ टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून ऑलिव्ह ऑईल आणि चवीनुसार मीठ.
केळीचे बारीक स्लाइस करा. त्यात काळी मिरी पावडर, लाल तिखट, मीठ आणि ऑलिव्ह ऑईल घालून मिक्स करा.
मायक्रोवेव्ह २०० डिग्री सेल्सिअसवर १० मिनिटे प्रीहीट करा.
केळीचे चिप्स एका बेकिंग शीटवर मोकळे करून ठेवा. त्यांना मायक्रोवेव्हमध्ये ५ मिनिटे बेक होऊ द्या.
तुम्ही हे तेलात सुद्धा तळू शकता. तुमचे क्रिस्पी केळीचे चिप्स तयार आहेत.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा