अक्षय्य तृतीयेच्या आधी घरातून बाहेर काढा ‘या’ गोष्टी!

By Harshada Bhirvandekar
May 06, 2024

Hindustan Times
Marathi

यंदाची अक्षय्य तृतीया १० मे रोजी आहे. या दिवशी शुभ मुहूर्त न पाहता घरोघरी लग्न आणि इतर शुभारंभाची कामे केली जातात. 

या दिवशी एखादी मौल्यवान वस्तू घरी आणल्याने समृद्धी येते. पण, अशा काही गोष्टी आहेत, ज्या या दिवशी आवर्जून घराबाहेर काढल्या पाहिजेत.  

झाडू ही माता लक्ष्मीची प्रतीक आहे. झाडूबाबत शास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत.  

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरात तुटलेला झाडू ठेवू नका. यामुळे घरातील आशीर्वाद निघून जातात आणि नकारात्मक ऊर्जा येते.  

घरात तुटलेल्या चपला असल्या कारणाने अलक्ष्मीचा वास होतो. अलक्ष्मी ही स्वतःसोबत दारिद्र्य घेऊन येते. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अशा तुटक्या चपला बाहेर फेकून देणे गरजेचे आहे.  

अक्षय्य तृतीयेच्या आधीच तुम्ही घरातील फुटकी भांडी बाहेर फेकून दिली पाहिजेत. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल.  

फुटक्या भांड्यांमुळे घरात अशांती येते आणि जिथे अशांती असते, तिथे माता लक्ष्मी कधीच राहत नाही. 

अक्षय्य तृतीयेच्या आधी तुमच्या घरात ज्या सुकलेल्या वनस्पती असतील त्यांना मातीत पुरा अथवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात सोडून द्या. 

वाळलेली झाडं घरात वास्तुदोष निर्माण करतात. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अक्षय्य तृतीयेच्या आधीच या गोष्टी आवश्यक घराबाहेर काढा.

फाफ डुप्लेसिसची पत्नी दिसते खुपच सुंदर!