वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक स्थानाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विशेषतः घरातील देवघर वास्तूमध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते.
घरातील देव्हाऱ्यातून सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. याच्या प्रभावामुळे घरातील सदस्यांना देवाचा आशीर्वाद मिळतो.
त्याचबरोबर असे मानले जाते की, घरातील देव्हाऱ्यात किंवा देव्हाऱ्याजवळ काही वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मकता येऊ शकते. अशा कोणत्या गोष्टी आहेत, जाणून घ्या...
घराच्या देव्हाऱ्याजवळ पूर्वजांचे फोटो लावणे अशुभ मानले जाते. या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावणे म्हणजे देवाचा अपमान मानला जातो.
जुनी फाटलेली धार्मिक पुस्तके घरातील देव्हाऱ्यात ठेवू नये. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.
याशिवाय सुकलेली फुले मंदिरात अथवा देवघरात ठेवू नये, असे केल्याने जीवनात उदासीनता येते.
बरेच लोक आपल्या घरातील मंदिरात भरपूर शंख ठेवतात वास्तुशास्त्रानुसार देवघरात एकापेक्षा अधिक शंख ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो.
घराच्या मंदिरात शनि देवाची मूर्ती कधीही ठेवू नये. असे मानले जाते की, यामुळे शनि देवाची वाईट नजर घरातल्या सदस्यांवर पडते.
घरातील देव्हाऱ्यात किंवा देव्हाऱ्याच्या आजूबाजूला रद्दी किंवा निरुपयोगी वस्तू ठेवू नयेत.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान