या राशींना प्रवास खूपच प्रिय

By Rohit Bibhishan Jetnavare
May 03, 2024

Hindustan Times
Marathi

प्रवासाची आवड प्रत्येकाला असते, पण काही लोक असे असतात ज्यांच्यासाठी देशभर आणि जगभर फिरणे हेच जीवनाचे उद्दिष्ट असते. 

ज्योतिष शास्त्रात अशा काही राशींचा उल्लेख आहे, या राशींचे लोक एका ठिकाणी जास्त काळ टिकत नाहीत. 

आयुष्यात कितीही धावपळ सुरू असली तरी त्यांना प्रवासासाठी नेहमीच वेळ मिळतो. आज आम्ही तुम्हाला त्या राशींबद्दल माहिती देणार आहोत.  

मेष राशीचे लोक प्रवासाच्या बाबतीत आघाडीवर असतात. या राशीच्या लोकांना नवीन ठिकाणी भेट द्यायला आवडते.

मेष 

 त्यांच्याकडे इतर कशासाठीही वेळ नसतो पण जेव्हा प्रवासाचा प्लॅन बनतो, तेव्हा त्यांना वेळ मिळतो. विशेष म्हणजे ते एकटेदेखील प्रवासाला निघू शकतात. अनेकदा ते अशाच प्रकारच्या नोकऱ्या करतात ज्यात त्यांना प्रवास करण्याची संधी मिळते.

सिंह राशीच्या लोकांना सिंहासारखे कोणतेही बंधन नसते. या राशीचे लोक प्रवासासाठी अज्ञात शहरात किंवा देशात जाण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

सिंह

 ज्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी हवा आवश्यक आहे, त्याचप्रमाणे या राशीच्या लोकांसाठी प्रवास करणे देखील खूप महत्वाचे आहे. 

या राशीचे लोक सर्जनशील आणि कलाप्रेमी मानले जातात. हे लोक आपली सर्जनशीलता वाढवण्यासाठी अनेक ठिकाणी प्रवास करू शकतात.

तूळ

प्रवास त्यांच्यासाठी औषधासारखे काम करतो. जेव्हा जेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्यात तणाव जाणवतो तेव्हा ते एखाद्या मोकळ्या ठिकाणी फिरायला जाऊ शकतात.   

या राशीचे लोक त्यांच्या पायाला पंख घेऊन जन्माला येतात. या राशीचे एकांताच्या शोधात त्यांच्या सभोवतालच्या लोकांपासून दूर जाऊ शकतात. 

धनु

प्रवास हा त्यांच्यासाठी केवळ छंदच नाही तर त्यांच्या आयुष्याला एक नवीन आयाम देणारे एक कारण आहे. असे लोक एकटेही प्रवासाला निघू शकतात.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान