पती-पत्नीत स्नेह निर्माण होईल, या ४ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ घडेल
By
Priyanka Chetan Mali
Apr 24, 2024
Hindustan Times
Marathi
आज २४ एप्रिल बुधवार रोजी चंद्र तूळ राशीत भ्रमण करणार आहे. ग्रह-नक्षत्राच्या बदलाचा या ४ राशींना लाभ होईल.
कन्याः आज नोकरी, व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काचे प्रकरण मार्गी लागेल.
कौटुंबिक वातावरण चांगले राहील. संततीची उज्ज्वल भविष्य घडेल. व्यापारात आर्थिक प्रगती होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल.
मकरः आज लाभदायक दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. रेंगाळलेली कामे गती घेतील. घरात मंगल कार्य घडतील. पदप्राप्ती होईल.
कामाप्रती सजग राहा. विद्यार्थ्याची अभ्यासात प्रगती होईल. अचानक आर्थिक लाभ घडेल. गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे.
कुंभः पैशाची आवक चांगली राहील. प्रेम प्रकरणासाठी उत्तम दिवस आहे. मोठे यश प्राप्त होईल.
नोकरदारास सलोख्याचे वातावरण अनुभवता येईल. नावलौकिकेत वाढ होईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल.
मीनः आज आनंद प्राप्त होईल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील. मानसिक सौख्य लाभेल. आर्थिक कामे मनासारखी घडतील.
अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. प्रगती होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. प्रवास हितकारक ठरतील.
महाकुंभ मेळ्यानंतर कुठे जातात नागा साधू?
पुढील स्टोरी क्लिक करा