या ४ राशीच्या लोकांसाठी यशाचा दिवस, वातावरण उत्साहवर्धक राहील
By
Priyanka Chetan Mali
Apr 23, 2024
Hindustan Times
Marathi
आज २३ एप्रिल मंगळवार रोजी चंद्र कन्या नंतर तूळ राशीत भ्रमण करणार आहे. या ४ राशींना दिवस लाभदायक जाईल.
मेषः आज आर्थिक आवक चांगली राहील. प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल.
वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. व्यापारिक स्पर्धेत यशस्वी व्हाल. कामाचे कौतुक होईल. वातावरण उत्साहवर्धक राहील.
मिथुन: संधी मिळतील. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आध्यात्मिक प्रगती चांगली होईल.
कार्यक्षेत्रात यश मिळेल व उत्साह वाढेल. व्यापारात आर्थिक फायदा होईल. स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील.
सिंहः आज नोकरी, व्यवसायात फायदा होईल. प्रभावशाली व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. कोणतेही काम सहजतेने कराल.
व्यापारिक वाद संपुष्टात येतील. सरकारी काम वेळेवर पूर्ण होतील. मौजमजा करण्याकडे कल राहील. प्रवासातून आर्थिक लाभ होतील.
तूळ: आज कार्यक्षेत्रात वेळेचा चांगला सदुपयोग होईल व अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाज कराल. व्यवसाय फायदेशीर राहील.
महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घडतील. आर्थिक लाभ होतील. कार्यक्षेत्रात प्रगती होईल.
'या' आहेत जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या रेल्वे!
पुढील स्टोरी क्लिक करा