‘हीरामंडी’तील ‘ही’ अभिनेत्री आहे संजय लीला भन्साळींची भाची!

By Harshada Bhirvandekar
Apr 20, 2024

Hindustan Times
Marathi

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या चित्रपटात ब्रिटिश सरकार विरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान गणिकांचे जीवन कसं होतं, याची झलक पाहायला मिळणार आहे. 

भन्साळींच्या ‘हीरामंडी’मध्ये दमदार कथानकासोबतच बॉलिवूडमधील काही चर्चित अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

‘हीरामंडी’च्या या सुंदर अभिनेत्रींमध्ये संजय लीला भन्साळी यांची सख्खी भाची देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.  

‘हीरामंडी’मध्ये ‘आलमजेब’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्मिन सेगल ही संजय लीला भन्साळी यांची खरी भाची आहे. 

संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातून तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 

त्यानंतर शर्मिनने ‘मलाल’ या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. या चित्रपटात तिच्यासोबत मिझान जाफरी मुख्य भूमिकेत होता.  

‘मलाल’ या चित्रपटासाठी शर्मिन सेगलला फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना फार आवडला होता.  

शर्मिन आपल्या मामाला म्हणजेच संजय लीला भन्साळी यांना आपला आयडॉल मानते. ती आपल्या यशाचं सगळं श्रेय मामाला देते.  

शर्मिन सेगल अतिशय सिम्पल आणि साधी अभिनेत्री आहे. तिला नेहमीच सिम्पल लूकमध्ये राहायला आवडतं.

आयपीएलमधील सर्वात मोठा विजय