स्वप्नात दिसलेल्या ‘या’ गोष्टी देतात श्रीमंतीचे संकेत!
By
Harshada Bhirvandekar
Apr 26, 2024
Hindustan Times
Marathi
स्वप्नशास्त्रानुसार, कधीकधी स्वप्ने आपल्याला भविष्यातील घटनांचे संकेत देतात. यातील काही स्वप्न खूप शुभ असतात.
आज आम्ही तुम्हाला अशा स्वप्नांबद्दल सांगणार आहोत, जे श्रीमंत होण्याचे संकेत देतात.
जर, तुम्हाला स्वप्नात सापाचे बीळ दिसले, तर ते शुभ मानले जाते. हे स्वप्न असे संकेत देते की, भविष्यात तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळणार आहे.
स्वप्नात एखादी स्त्री नाचताना दिसली, तर ते खूप शुभ मानले जाते. यामुळे भविष्यात त्यांना अपेक्षित धनप्राप्तीचे संकेत मिळतात.
जर, तुम्हाला स्वप्नात सोने दिसले, तर ते घरात लक्ष्मी येण्याचे लक्षण आहे. यामुळे तुमच्या घरात धनाचा वर्षाव होऊ शकतो.
मधमाशांचे पोळे स्वप्नात दिसणे शुभ मानले जाते. हे धनप्राप्तीचे संकेत देणारे स्वप्न आहे.
स्वप्नात उंदीर दिसणे देखील शुभ मानले जाते. स्वप्नात उंदीर दिसला तर, घरात पैसा येतो असे म्हटले जाते.
स्वप्नात देवी देवतांना पाहणे देखील खूप शुभ आहे. यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घरी येईल आणि त्यासोबत संपत्ती आणि यशही येणार आहे.
जर, तुम्हाला स्वप्नात जळता दिवा दिसला, तर ते धन आणि यशप्राप्तीचे संकेत असू शकतात.
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा