रजनीकांत यांचं एकूण नेटवर्थ माहितीये का?

By Harshada Bhirvandekar
Dec 12, 2023

Hindustan Times
Marathi

सुपरस्टार रजनीकांत यांचं नेटवर्थ जवळपास ४३० कोटी रुपये आहे. 

प्रत्येक चित्रपटासाठी रजनीकांत तब्बल ५० कोटी मानधन आकारतात. 

मात्र, चित्रपट न चालल्यास त्यातील काही रक्कम ते निर्मात्यांना परत करतात. 

ब्रँड एंडोर्समेंटमधून देखील रजनीकांत भरपूर कमाई करतात. काही मोजक्याच ब्रँडसाठी ते काम करतात. 

रजनीकांत यांचा बंगला चेन्नईमध्ये असून, त्यात भलीमोठी बाग आहे. या बंगल्याची किंमत ३५ कोटी आहे. 

या शिवाय त्यांच्याकडे 'राघवेंद्र मंडपम' हा लग्नाचा हॉल देखील आहे, ज्याची किंमत २० कोटी आहे.  

रजनीकांत यांच्याकडे ६ कोटींची रोल्स रॉयस घोस्ट आणि १७ कोटींची रोल्स रॉयस फँटम या शिवाय अनेक कार्स आहेत. 

या शिवाय त्यांच्याकडे ६ कोटींची बेन्टली लिमॉझिनी असून, तिच्यावर तब्बल २२ कोटी खर्च करण्यात आला आहे. 

याशिवाय त्यांनी अनेक व्यवसायांमध्ये मोठी गुंतवणूक देखील केली आहे. 

भिंतीवरील कोणत्या रंगांचा अर्थ काय?