राहुल गांधींना दोन वर्षांचा तुरुंगावास!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Mar 23, 2023

Hindustan Times
Marathi

अदानी प्रकरणावरून मोदी सरकारला घेरणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जोरदार झटका बसला

कर्नाटकातील कोलार येथील निवडणुकीच्या सभेत राहुल गांधी मोदी अडनावावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते.

मोदी आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी सुरत जिल्हा न्यायालयानं राहुल गांधींना दोन वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली

सुरत जिल्हा न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे.

न्यायालयानं राहुल यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी ३० दिवसांची मुदत देत जामीन मंजूर केला.

निकालाच्या वेळी खुद्द राहुल गांधीही न्यायालयात हजर होते.

या प्रकरणाची सुनावणी संपल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांनी आदेश राखून ठेवला.

मी केवळ भ्रष्टाचाराविरोधात बोलतो, जाणूनबुजून काहीही बोललो नाही, असे राहुल यांनी सांगितले.

या प्रकरणी राहुल गांधींना तीन वेळा न्यायालयात हजर राहावं लागलं.

उन्हाळ्यात खा हे हेल्दी सीड्स