पहिल्यांदा टी२० विश्वचषक खेळणारे भारतीय!

By Ashwjeet Rajendra Jagtap
May 01, 2024

Hindustan Times
Marathi

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्मा कर्णधार तर हार्दिक पांड्या उपकर्णधार आहे.

काही खेळाडूंची पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ते कोण आहेत ते पाहूया.

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारा जैस्वाल रोहित शर्मासोबत भारताच्या डावाची सुरुवात करेलय. ही त्याची पदार्पण टी-20 विश्वचषक स्पर्धा आहे.

भारतासाठी २१ टी-२० सामने खेळलेला शिवम दुबे आयपीएलमध्ये सीएसकेकडून वादळी फलंदाजी करताना दिसत आहे. तो एक अप्रतिम फिनिशर म्हणून उदयास आला आहे. मात्र, तो त्याच्या कारकिर्दीतील पहिलाच टी-२० विश्वचषक खेळणार आहे.

भारताचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन आता प्रथमच टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलमधील चमकदार कामगिरीमुळे त्याची विश्वचषकासाठी निवड झाली.

कुलदीप यादवची टी-२० विश्वचषकात पहिल्यांदाच निवड झाली. त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

वेगवान गोलंदाज सिराजचा हा पहिलाच टी-२० विश्वचषक आहे.

हार्मोनल असंतुलन सुधारणारे  ‘हे’ पदार्थ माहितीयत?