‘मंजू माई’बद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

By Harshada Bhirvandekar
May 21, 2024

Hindustan Times
Marathi

‘लापता लेडीज’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर खोलवर छाप सोडली आहे. कथेपासून ते पात्र आणि संवादांपर्यंत हा चित्रपट सगळ्यांनाच आवडत आहे.  

या चित्रपटातील ‘मंजूमाई’ची व्यक्तिरेखा खूप प्रेरणादायी आणि दमदार आहे. अभिनेत्री छाया कदम यांनी ही भूमिका अतिशय उत्तमपणे साकारली आहे.  

छाया कदम यांचा अभिनय आणि त्यांची डायलॉग डिलिव्हरी एकदम खरी वाटते. या चित्रपटातील छोट्याशा भूमिकेतूनही त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.  

त्यांच्या चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहेत. या चित्रपटात मंजूमाईंनी सांगितलेले प्रत्येक गोष्ट विचार करायला भाग पाडते आणि समाजाला आरसा ही दाखवते.  

मेहनत आणि प्रतिमेच्या बळावर छाया कदम यांनी कान्स फिल्म फेस्टिवल २०२४मध्ये ही पदार्पण केले आहे.  

छाया कदम यांचा कान्समधील लूकही खूप वेगळा होता. त्यांनी खास त्यांच्या आईची साडी आणि नथ परिधान केली होती.  

छाया कदम या राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू आहेत, हे फार कमी लोकांना माहित आहे. लहानपणापासूनच त्या खेळात माहीर आहेत.  

त्यांना अभिनयात खूप रस होता. यामुळेच त्यांनी मराठी रंगभूमीवरून अभिनय विश्वात पदार्पण केले.  

‘लापता लेडीज’ व्यतिरिक्त छाया कदम यांनी ‘सिंघम रिटर्न’, ‘मडगाव एक्सप्रेस’ आणि अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!