अवघ्या दोन दिवसांवर गुढी पाडवा अर्थात नववर्ष आलं आहे.

By Dilip Ramchandra Vaze
Mar 20, 2023

Hindustan Times
Marathi

विविध शहरांच्या मुख्य रस्त्यांवर भलीमोठी रांगोळी काढली जाते. या रांगोळ्या लक्षवेधक ठरतात.

फक्त मिरवणुकाच नाही तर या दिवशी जेवणही स्पेशल असतं. कुठे श्रीखंड पुरीचा बेत असतो तर कुठे बासुंदी असते. काही घरात फक्क़ड मसाले भात बनवला जातो. सण स्पेशल तर जेवणही स्पेशल.

छोट्यात छोटी गुढी ते भलीमोठी गुढी. ज्याची जशी आवड तशी गुढी पाहायला मिळते. काही जण आपल्या गाडीतही छोटीशी गुढी उभारतात. 

काही ठिकाणी बेभान होऊन उत्सवाचे रंग उधळलेले पाहायला मिळतात.

नववारीला साथ मिळते ती पारंपारीक नथीची आणि डोक्यावर फेट्याची. आजकाल कपाळावर चंद्रकोर आणि डोळ्यावर गॉगल लावत तरुणी या उत्सवाला हजेरी लावतात.

फुलांच्या माळेनं, बत्ताशाच्या साथीनं आणि कडूलिंबाच्या पाल्यानं गुढीला साडीनं सजवलं जातं. सूर्योदयाला गुढी उभारली जाते आणि सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवली जाते.

तेव्हा यंदाही गुढी पाडवा उत्साहात साजरा करुया. नव्या वर्षाचा काही संकल्प करुया.

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा 

जास्त टरबूज खाण्याचे दुष्परिणाम

Pexels