शेवंताबाईची शेवंताताई झाली! अपूर्वा नेमळेकरचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
All Photos: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Apr 23, 2024
Hindustan Times
Marathi
‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेमधून ‘सावनी’ या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर.
अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले’सारखी मालिका आणि ‘बिग बॉस मराठी ४’ या कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.
अपूर्वाने मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे.
अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून, तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
आता अपूर्वा नेमळेकरने तिच्या सोशल मीडियावर जिममधले काही खास फोटो शेअर केले आहेत.
अपूर्वाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिचे वजन कमी झाल्याचे दिसून येत आहे.
यासाठी तिने घेतलेली मेहनत या फोटोंमधून पाहायला मिळत आहे.
अपूर्वाने याआधी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंता ही भूमिका केली होती. यात तिचे वजन अधिक होते.
अपूर्वाने नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने आपले वजन बऱ्यापैकी कमी केल्याचे दिसून येत आहे.
स्मृती मानधनानं किती शतकं ठोकली?
पुढील स्टोरी क्लिक करा