कामदा एकादशीच्या रात्री हे उपाय करा

By Rohit Bibhishan Jetnavare
Apr 19, 2024

Hindustan Times
Marathi

कामदा एकादशीचे व्रत चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला केले जाते. यंदा कामदा एकादशीचे व्रत शुक्रवारी १९ एप्रिलला आहे.

धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.

कामदा एकादशीच्या रात्री काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. 

आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांची माहिती देणार आहोत.

ज्योतिषांच्या मते कामदा एकादशीच्या रात्री लाल कपड्यात लहान नारळ आणि तुळशीचे फूल बांधून ठेवावे. असे केल्याने धनात वाढ होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.

कामदा एकादशीच्या रात्री, तुळशीला तुपाचा दिवा लावा, यानंतर तुमची इच्छा पूर्ण होण्याची विष्णूकडे प्रार्थना करा.

कामदा एकादशीच्या रात्री भगवान विष्णूला पिवळी खीर अर्पण करा. यानंतर देवाची आरती करा.

कामदा एकादशीच्या रात्री श्रीयंत्राची पूजा करा आणि नंतर देवी लक्ष्मीच्या सूक्ताचा पाठ करा. 

यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर करते.

ध्येय गाठण्यासाठी फॉलो करा हे मार्ग