‘या’ दिशेला कैची ठेवाल, तर घरात होईल भरभराट!

By Harshada Bhirvandekar
Apr 20, 2024

Hindustan Times
Marathi

कात्री प्रत्येक घरात असते. घरातील महत्त्वाच्या गोष्टींपैकी ती एक आहे. पण, जर कात्री ठेवण्याची दिशा चुकली तर, तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. 

त्यामुळे कात्री योग्य दिशेलाच ठेवावी. कात्री चुकीच्या दिशेने ठेवणं, केवळ तुमच्या आरोग्यावरच परिणाम करत नाही, तर आर्थिक नुकसानही होऊ शकते. 

कात्री अर्थात कैची ही एक धारदार वस्तू आहे, जी केतूचे प्रतीक मानली जाते. 

जर तुमच्या कुंडलीत केतूची दशा वाईट असेल, तर अशा घरात कात्री योग्य दिशेने ठेवणं अधिक गरजेचे आहे.

घरात गंजलेली कात्री असेल, तर ती सगळ्यात आधी बाहेर फेकून देणे उचित ठरेल. 

कुंडलीतील केतू ग्रहाची चांगली स्थिती जीवनात केवळ आनंद आणि शांती देत नाही, तर सौख्यही देते. 

कात्री ठेवण्याची योग्य दिशा दक्षिण पश्चिम आहे. कात्रीबरोबरच घरातील धारदार सामान, टोकदार वस्तू, टूल बॉक्स या गोष्टी देखील याच दिशेला ठेववयात. 

तुमच्या घरात दक्षिण पश्चिम जागा नसेल, तर वायव्य दिशेलाही कात्री ठेवता येईल. पण कात्री ठेवताना ती झाकून ठेवली जाईल, याची काळजी घ्या.  

चुकूनही कात्री किंवा धारदार वस्तू घराच्या ईशान्य दिशेला ठेवू नका. असे केल्यास मानसिक अस्वस्थता आणि गोंधळ निर्माण होईल.

प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘या’ ५ गोष्टी; भगवान शिव होतील प्रसन्न!